सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | एस. के .डी. चॅरिटेबल ट्रस्ट संचलित व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भावडे येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय बॉल- बॅडमिंटन १४, १७ व १९ वयोगटातील मुले व मुली स्पर्धेत भावडे येथील व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या १४ वर्षीय मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात सिन्नरच्या वाजे विद्यालया सोबत सामना जिंकून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विभागीय स्तरासाठी पात्र झाले आहेत. यात दिव्यानी वाघ, समृद्धी देवरे, ईश्वरी काकुळते, अनिषा मोरे, खुशाली कापडणीस, गुंजन पगार, प्रियंका बच्छाव, तन्वी देवरे, ग्रीष्मा पगार, नूतन शिरसाठ या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजय मिळविला.
Deola | विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती जागृत ठेवावी- प्रा. डॉ.पाटील
सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन
सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक यज्ञेश आहेर, निलेश भालेराव यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. यशासाठी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष देवरे, सचिव मीना देवरे, प्राचार्य .एन. के. वाघ, बबलू देवरे, कैलास सागर आदी उपस्थित होते. आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम