Nashik | ‘नाशकात मोठी गुंतवणूक आणणार, 80 टक्के चर्चा पूर्ण’; उद्योग मंत्री उदय सामंतांची घोषणा

0
55
#image_title

Nashik | उद्योग मंत्री उदय सामंत यांनी “मॅग्नेटिक महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत नाशिकला गुंतवणूक देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. असे सांगत त्या दृष्टीने बोलणी सुरू असून डिसेंबरपर्यंत डिफेन्स किंवा ऑटो इंडस्ट्री मधून 3 ते 8 हजार कोटींची गुंतवणूक नाशिकमध्ये येणार असल्याचे सांगितले. तसेच एका डिफेन्स कंपनीशी याबाबतीत 80% चर्चा पूर्ण झाली असून राज्यातील नागपूर, नाशिक, शिर्डी, पुणे आणि रत्नागिरी या ठिकाणी डिफेन्स क्लस्टर उभारले जाणार असल्याने नाशिकमध्ये संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांनी उत्सुकता दाखवली आहे. त्यामुळे पुढील अँकर इंडस्ट्री म्हणून संरक्षण क्षेत्रातील कंपनी नाशिकमध्ये असेल अशी ग्वाही दिली आहे.

Nashik | नाशकात तक्रार दाखल करणाऱ्या फिर्यादीला पोलिसाकडून मारहाण; अधिकारी निलंबित

काय म्हणाले उद्योग मंत्री

“पायाभूत सुविधांसाठी जिल्ह्यात 317 कोटींची कामे सुरू करणार असून उद्योगांच्या वाढीव घरपट्टी बाबत आचारसंहिता लागण्याच्या आत निर्णय घेतले जातील. तर कोकणातील मँगो, काजू पार्कच्या धरतीवर जिल्ह्यातील कृषी प्रक्रिया प्रकल्प आणणार असून उद्योगांना वीजजोडणी देणे सुलभ व्हावे यासाठी औद्योगिक महामंडळ उपकेंद्रासाठी जागा देणारा असल्याचे सांगितले. सातपुरातील हॉस्पिटलमध्ये उद्योग विभागातर्फे आयोजित “उद्यमात सकल समृद्धी – महाराष्ट्राची उद्योग भरारी” या कार्यक्रमात मंत्री उदय सामंत बोलत होते. यावेळी त्यांनी उद्योग विभागाच्या मागील दोन वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला.

वाहन क्षेत्रातील कंपनी आणण्याचे प्रयत्न सुरू

यावेळी नाशिकमध्ये मोठा उद्योग आणण्याच्या उद्योजकांच्या मागणीला उत्तरदेत, त्यांनी नाशिकला अपेक्षे पेक्षा मोठा प्रकल्प दिला जाणार असून संबंधितांशी 80% चर्चा पूर्ण झाली आहे असे सांगत डिफेन्स क्लस्टरमध्ये नाशिकचा समावेश असल्याने डिफेन्सचा प्रकल्प येणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट केले. तसेच जोपर्यंत शासनाकडून इन्सेंटिव्ह निश्चित केला जात नाही तोपर्यंत कंपनीकडून होकार दिला जात नसल्यामुळे कंपनीच्या नावाची घोषणा करीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्यावेळी गुंतवणुकी बाबतची चर्चा पूर्ण होईल तेव्हा संबंधित कंपनीचे संचालक याबाबतची अधिकृत घोषणा करण्यासाठी नाशिकला येतील. असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे वाहन क्षेत्रातील कंपनी आणण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्योग क्षेत्रातील समस्यांकडे लक्ष वेधले

यावेळी औद्योगिक क्षेत्रात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प भरावा यासह अन्य मागण्या खासदार वाजे यांनी त्यांच्यासमोर मांडल्या. तसेच मुंबई महामार्गाच्या दुरावस्थेकडे त्यांनी लक्ष वेधले. निमा अध्यक्ष धनंजय बेळेंनी मोठी गुंतवणूक, घरपट्टी हे प्रश्न मांडले. म्हणजे सामंत यांच्या हस्ते त्यासाठी योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश व नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. औद्योगिक महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी,संजय सोनवणे, आमदार सीमा हिरे, निमाचे सचिव निखिल पांचाळ, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, अधीक्षक अभियंता बाळासाहेब झंजे,कार्यकारी अभियंता जयवंत पवार आदी उपस्थित होते.

महिंद्रा कंपनी गुंतवणूक करणार?

महिंद्रा कंपनीने नाशिक मध्ये गुंतवणूक करावी या मागणीची दखल घेत गेल्या महिन्यातच आनंद महिंद्रा यांच्याशी बोलणे झाले असून ते नाशिक मध्ये गुंतवणूक करणार आहेत असे उदय सामान्य सांगितले.

गुंतवणुकीवरून विरोधकांना टोला

विरोधकांकडून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असल्याचे फेकणारे ठेवले जात असून त्यामध्ये कसलेही तथ्य नाही याबाबत याबाबत श्वेता पत्रिका काढली असता त्यावर विरोधकांनी अवाक्षरही उच्चारले नाही एका महिन्यात सहज महाराष्ट्रात 75 हजार कोटींची गुंतवणूक आली असून परकीय गुंतवणूक महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचेही सामंतांनी सांगितले.

Nashik News | इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात बुडून युवकाचा मृत्यू

उद्योजकांचा आकडा वाढू शकतो… 

दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत 32,700 उद्योजक तयार करण्याचे काम आम्ही केले असून हा आकडा मोठा होऊ शकतो परंतु बँकांकडून अद्यापही नवल उद्योजकांना कर्जासाठी सहाय्य केले जात नाही याबाबत कोणी धाडस करून बँके विरोधात पोलिसात तक्रार केल्यास बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल होईल असे उद्योग मंत्री म्हणाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here