Nashik News | इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात बुडून युवकाचा मृत्यू

0
39
#image_title

Nashik News | इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटन आणि पोहण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. अतिक नाशिर खान असे युवकाचे नाव असून त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो धरणाच्या ओव्हर फ्लोमध्ये बुडाला.

Nashik News | नाशकात म्हाडाच्या राखीव सदनिकांची अधिकाऱ्यांकडून विल्हेवाट

या घटनेची माहिती इगतपुरी पोलिसांना समजतात त्यांच्या पथकाने तातडीने शोध व बचाव कार्यास सुरुवात केली. यानंतर आज त्याचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले असून मंगळवारी सकाळी अतिक नाशिर खान (रा. वर्सोवा, मुंबई) तालुक्यात भावली धरणात पोहण्यासाठी आला होता.

Nashik News | दादा भुसेंच्या प्रयत्नांना यश; मालेगावात डाळिंब इस्टेटला मंजुरी

पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू

यावेळी त्याला भावली धरणा जवळील ओवर फ्लो पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी इगतपुरी पोलिसांना दिली. यानंतर स्थानिक पाणबुड्या व्यक्तींकडून शोध कार्य सुरू करण्यात आले होते. त्यानंतर, आज दुपारी शोध कार्याला यश आले असून युवकाचा मृतदेह पुढील तपासणीसाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here