सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | शारदीय नवरात्रोत्सवास (दि.३) पासून प्रारंभ होत असल्याने खान्देश भागातील भाविक सप्तशृंगी गडावरून मशालीद्वारे ज्योत आपापल्या गावी कोणतेही पादत्राणे न घालता पायी घेऊन जात आहेत. यात मालेगाव, पाचोरा, धुळे, चाळीसगाव, जळगाव, जामनेर या भागातील भाविकांचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळीही त्यांचा प्रवास चालू असतो. नवरात्र उत्सवास प्रारंभ होत असल्याने कसमादेसह खानदेशातील घराघरात व सार्वजनिक मंडळांमार्फत घटस्थापना केली जाते. यासाठी नऊ दिवस उपवास केले जातात.
Deola | चांदवड महारोजगार मेळावा; एक हजार ३५८ उमेदवारांना मिळाली नोकरीची संधी
सप्तशृंगी देवीच्या गडावरील ज्योतीला महत्त्व
घटस्थापनेच्या अखंड दिव्यासाठी सप्तशृंगीदेवीच्या गडावरील ज्योतीला महत्व आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी दोन-तीन दिवस अगोदरपासून भाविक गडावरील अखंड ज्योत मशालीच्या साहाय्याने आपल्या गावी घेऊन जातात. गावातील सर्व घरातील घट तसेच सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी या ज्योतीद्वारे दिवे प्रज्वलित केले जातात. उत्तर महाराष्ट्राबरोबरच कसमादेसह नाशिक जिल्ह्यातही ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे चालू आहे. त्यांच्या भक्तीला कुठेही अडथळा येऊ नये म्हणून इतर भाविक ठिकठिकाणी मदतीचा हात देऊन ज्योत पोहचविण्यास हातभार लावतात.
Deola | विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा अपघात
दुपारच्या उन्हामुळे सकाळी सायंकाळी आणि रात्री ज्योतीचा प्रवास
ऊन असूनही हे भाविक न थांबता ज्योत घेऊन आपल्या गावाच्या दिशेने धावतांना दिसतात. एक थकला कि दुसरा नंतर तिसरा अशा क्रमाने हि ज्योत नेली जाते. यावर्षी ज्योत नेण्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे. सोबत तीन चाकी रिक्षा, पिकअप, टेम्पो, ट्रॅक्टर अशी वाहने असून जेवणखाण आणि ज्योत घेणाऱ्यांची काळजी घेतली जाते. दमट हवामान, ऊन (ऑक्टोबर हिट) असल्याने दुपारी आराम करत सकाळी, सायंकाळी व रात्री ज्योतीचा प्रवास होतो.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम