Nashik | नाशिक येथील प्रणाली विलास पंचभाई हिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अर्थातच एनआयडीच्या प्रवेश परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत संपूर्ण भारतातून ‘ऑल इंडिया रँकिंग’मध्ये (एआयआर) सहावा क्रमांक मिळवला आहे. प्रणालीने नाशिकच्याच एसएमआरके महिला महाविद्यालयातून ‘फाईन आर्टस’ विषयात पदवी संपादन केली आहे. ती गेल्या २ वर्षांपासून पदव्यूत्तर पदवीच्या ‘एनआयडी-२०२४’ परीक्षेची तयारी करत होती. प्रणाली नाशिकमधीलच ‘विजय डिझाईन स्टुडिओ’ची विद्यार्थिनी असून, तिने या परीक्षेची तयारी प्रा. विजय देवरे यांच्य मार्गदर्शनाखाली केली आहे.
गेल्या २ वर्षात प्रणालीने अथक परिश्रम घेत हे सर्वोत्तम यश आपल्या मेहनतीने आणि दृढ इच्छेने प्राप्त केले आहे. प्रणालीला अगदी लहानपणापासूनच कलेची आवड होती त्यातही तिची चित्रकला उत्तम असल्याने तिने फाइन आर्ट्स या विषयात पदवी घेण्याचा निर्धार केला. ही पदवी संपादन करत असताना तिने विजय डिझाईन स्टुडिओ येथे प्रवेश घेतला. तिथे तिला प्रा. संजय बागुल, प्रा. विजय देवरे, डिझायनर इमरान शेख आणि सिमर अलुवालिया यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले. ही परीक्षा देण्यासाठी तिचा आत्मविश्वास वाढावा, परीक्षा पार करण्याची जिद्द निर्माण व्हावी यासाठी या सगळ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका तर बजावली.
ही परीक्षा पार करणे तसेच सोपे नव्हते. परंतु विजय डिझाईन स्टुडिओमध्ये मिळणारे उत्कृष्ट मार्गदर्शन, नियमित मॉक टेस्ट, सराव सत्र यामुळे कौशल्य निर्माण व्हायला आणि सुधारायला फार मोठी मदत झाली. शिवाय विजय डिझाईन स्टुडिओने बँगलोर येथील अतिशय नावाजलेल्या ‘डीक्यू लॅब’ या संस्थेशी करार करून, या परीक्षेसाठी उपयोगी पडणारे डिजिटल शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. या शैक्षणिक साहित्याचा देखील मला फार मोठा फायदा झाला आहे. म्हणून या संपूर्ण यशाचे श्रेय माझ्या कुटुंबीयांइतकेच विजय डिझाईन स्टुडिओचे देखील आहे असे प्रणाली आवर्जून सांगते.
विजय डिझाईन स्टुडिओचे संस्थापक आणि मार्गदर्शक विजय देवरे यांनी प्रणालीच्या यशाचे कौतुक करत सांगितले की, आमच्या संस्थेसाठी ही फार मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे की, ऑल इंडिया रँकिंगमध्ये यश मिळवणारी प्रणाली ही आमची विद्यार्थिनी आहे. आमची संपूर्ण टीम सातत्याने डिझायनर्स, आर्किटेक्ट यांचे भविष्य घडविण्यात मदत करण्याच्या उद्देशाने कायम तत्पर आणि प्रयत्नशील असते. आम्ही फक्त प्रणालीलाच नव्हे तर आजवर असंख्य विद्यार्थ्यांना एनआयडी सारख्या अनेक परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक ती उपकरणे संसाधने आणि उत्कृष्ट मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रणालीच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या वतीने खूप शुभेच्छा!!
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम