Skip to content

Mahendra Thorve | मी दादा भूसेंच्या घरचं खात नाही; आमदाराने सगळंच काढलं

Mahendra Thorve

Mahendra Thorve | आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून, यातच आता अधिवेशनतून एक मोठी बातमी समोर आली आहे. यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाचे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. दरम्यान, यावर दादा भुसे यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नसून, मुख्यमंत्र्यांनीही यावर भाष्य करणे टाळले आहे. मात्र, अखेर महेंद्र थोरवे यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली असून, नेमके काय झाले हे त्यांनी सांगितले आहे. (Mahendra Thorve)

मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा जाणीवपूर्वक केलं नाही

दरम्यान, यावेळी आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, ”राज्याचे मंत्री असणाऱ्या दादा भुसेंना त्यांच्या खात्यातील भरत गोगावले, मी स्वतः, खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना कॉल करून सांगितलं होतं  की, काम करून घ्या. मात्र दादा भूसेंना सांगूनदेखील त्यांनी जाणीवपूर्वक ते टाळले. दरम्यान, आज मी त्यांना याबाबत त्या ठिकाणी विचारलं की, “दादा बाकीच्या लोकांची कामं काल तुम्ही मीटिंगमध्ये घेतली. पण मी सांगितलेलं काम तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा केलं नाही. याबाबत मी त्यांना विचारायला गेलो असता, ते माझ्यासोबत चिडून बोलले.”

Dada Bhuse | मंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाच्या आमदारात धक्काबुक्की

Mahendra Thorve | मी तुमच्या घरचं खात नाही

पुढे महेंद्र थोरवे म्हणाले की,”मी विचार केला की, आम्हीदेखील स्वाभिमानी आमदार आहोत. आम्हीही मुख्यमंत्र्यांसोबत प्रामाणिकपणे आहोत. पण तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी एखादी जबाबदारी दिली आहे तर, त्यांनी त्या आमदारांची कामे प्रामाणिकपणे केली पाहिजे. अशा प्रकारे ॲरोगंटपणे आम्हाला उत्तर देऊन त्या ठिकाणी आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही. मी तुम्हाला सांगितलेलं काम हे जनतेचं काम आहे. त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, “मी काय तुमच्या घरचं खात नाही. मला ते काम झालंच पाहिजे. ते माझ्या मतदारसंघातील काम आहे आणि ते काम तुम्ही पूर्ण करायलाच पाहिजे”. (Mahendra Thorve)

Kisan Sabha Protest | नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा पाचवा दिवस; अनेकांना साथीचे आजार

तुम्हाला मंत्री आम्ही केले

पुढे थोरवे म्हणाले की, ”ते माझ्याशी ॲरोगंटपणे बोलले म्हणून मी त्यांना बोललो की, तुम्ही हे अशा पद्धतीने आमच्यासोबत बोलू नका. आम्हीही आमदार आहोत आणि तुम्हाला मंत्री आम्हीच केले आहे. आम्ही देखील तीन लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करत असताना, आम्हीसुद्धा सभागृहात येऊन जी काय कामे असतील, त्या कामांचा मंत्र्यांकडून पाठपुरावा करत असतो, असे स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिले. (Mahendra Thorve)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!