Nashik News | नशिक जिल्ह्यातील मालेगाव या शहराचा ‘मिनी पाकिस्तान’ असा उल्लेख करणे हे आमदार नितेश राणे यांना महागात पडले आहे. दरम्यान, या प्रकारणी माजी आमदार आसिफ शेख यांनी भाजप आमदार नितेश राणे यांना नोटीस पाठवली आहे. ३०० कोटींच्या वीज चोरी प्रकरणासंदर्भात बोलताना प्रसार माध्यमांसमोर बोलताना आ. नितेश राणे म्हणाले होते की, हा पैसा ‘लव्ह जिहाद व लँड जिहाद’ साठी वापरला जातो.
तसेच, नितेश राणे यांनी मालेगावचा ‘मिनी पाकिस्तान’ असा उल्लेख करत शहराची बदनामी करणारे वाक्य हे प्रसार माध्यमात वापरल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असल्याचं माजी आमदार आसिफ शेख म्हणाले. तसेच,यामुळे भाजप आमदार नितेश राणे यांनी मालेगावच्या जनतेच्या भावना दुखावल्या असून, या प्रकरणी त्यांनी मालेगावकरांची व मुस्लिम समाजाची माफी मागावी, अशी मागणी या नोटीसीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तसेच जर, आमदार नितेश राणे यांनी मालेगावच्या जनतेची आणि मुस्लिम समाजाची माफी मागितली नाही तर, याबबात मालेगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्याचाही इशारा माजी आमदार आसिफ शेख यांनी दिला आहे.(Nashik News)
Trimbakeshwar | ‘दुष्काळाचे सावट दूर होवुदे’; पालकमंत्र्यांचे निवृत्तीनाथांना साकडे
हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण केले…
मालेगाव शहरात प्रत्येक सण आणि समारंभाच्या वेळी हिंदू-मुस्लिम एकोपा पाहायला मिळतो. पण तरीही या मालेगावाबद्दल भाजप आमदार नितेश राणे यांनी बदनामी करणारे वाक्य वापरले. तसेच हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी केलेला आहे. दरम्यान, ॲड. ए. ए. खान यांच्या माध्यमातून माजी आ. आसिफ शेख यांनी भाजप आ. नितेश राणे यांना याबाबत नोटीस पाठवली आहे. आता या नोटीसीला आणि आसिफ शेख यांना आमदार नितेश राणे हे कसे प्रत्युत्तर देतात हे बघणे महत्त्वाचं ठरणार आहे.(Nashik News)
Chhagan Bhujbal | नाभिक समाजाबद्दलच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण
Nashik News | काय म्हणाले आसिफ शेख ?
दरम्यान, या प्रकरणी माजी आमदार आसिफ शेख म्हणाले की,”३०० कोटींची वीज चोरी केल्या प्रकरणी आमदार नितेश राणे प्रसार माध्यमांसमोर बोलताना म्हणाले की,”हा पैसा ‘लव्ह जिहाद आणि लँड जिहाद’ साठी वापरला जात आहे. तर, याच संदर्भात बोलताना आमदार नितेश राणे यांनी मालेगावचा उल्लेख हा ‘मिनी पाकिस्तान’ असा केला होता. नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरून मालेगावच्या जनतेच्या भावना दुखावल्यामुळे माजी आमदार आसिफ शेख यांनी आमदार नितेश राणे यांनी आता मालेगावच्या लोकांची आणि मुस्लिम बांधवांची माफी मागावी अशी मागणी या नोटिसद्वारे करण्यात आली आहे. तसेच राणे यांनी माफी न मागितल्यास कोर्टात खटला दाखल करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.(Nashik News)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम