Maharashtra Goverment | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता अॅक्शन मोडवर आले असून, याद्वारे अनेक धडाकेबाज निर्णय घेतले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक काल पार पडली. या बैठकीत राज्य सरकारतर्फे २० धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहेत. याद्वारे अनेक जिल्ह्यांतील नागरिकांना आनंदवार्ता मिळाली आहे. यात काही नवीन योजनांचा समावेश करण्यात आला आहे. तर, यात युवा वर्गासोबतच ज्येष्ठ नगरिकांसाठीच्या योजनांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे… (Maharashtra Goverment)
Maharashtra Goverment | असे आहेत निर्णय..?
Nashik News | मालेगावचा ‘मिनी पाकिस्तान’ उल्लेख करणे राणेंना महागात पडले
- मुंबईतील नगरिकांना मालमत्ता कर वाढ करण्यात आलेली नाही.
- राज्यात ‘नमो महारोजगार’ मळव्यांचे आयोजन केले जाणार आहे. २ लाख रोजगार तथा स्वयंरोजगार निर्माण करण्यात येणार आहे.
- राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकार संवेदनशील असून, ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेतून ६५ वर्षांच्या वरील नागरिकांना लाभ दिला जाणार.
- राज्यातील सर्व नगर पालिकांमध्ये आता ‘नगरोत्थान महाभियान’ राबवले जाणार. तसेच पायाभूत सुविधा बळकट करणार. (Maharashtra Goverment)
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी बांबू लागवडीसाठी सरकार अनुदान देणार.
- ‘मधाचे गाव योजना’ संपूर्ण राज्याभरात राबवली जाणार. याद्वारे मध उद्योगाला प्रोत्साहन देणार.
- पर्यटन व्यवसायाला बळकटी देण्यासाठी जुन्नर तालुक्यात ‘बिबट सफारी’.
- बंजारा, लमाण या समाजाच्या तांड्यांचा विकास करणार. त्यांना मूलभूत सुविधा देणार.
- शिर्डी विमानतळाचा विस्तार करणार. याठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येणार.
- ‘धारावी पुनर्वसना’साठी केंद्र सरकारकडून मिठागर जागा मागतली जाणार.
- सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते दिले जाणार.
- ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन’ सांगोला येथील प्रकल्पाला मान्यता.(Maharashtra Goverment)
- ‘बिगर कृषी सहकारी’ संस्थांना अर्थसहाय्य दिले जाणार. पतसंस्थांनाही बळकटी देणार.
- ‘कोंढाणे लघु प्रकलपा’च्या कामाला वाढीव खर्चास मान्यता.
- ‘तिवसे लघु पाटबंधारे’ या योजनेची पुनर्स्थापना करण्यात येणार.
- नांदेड येथील गुरुद्वारासाठी ‘तख्त सचखंड श्री हजूद सादिब गुरुद्वारा’ अधिनियम.
- ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ची प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी येथे जनसंपर्क अधिकारी नेमण्यात येणार.
- कृषी विद्यापीठामधील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय ‘साठ’ वर्ष करण्यात येणार.
- सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ कार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभरण्यात येणार.
- गोसेवा आयोगासाठी यात ‘सहआयुक्त पशुसंवर्धन’ हे पद. (Maharashtra Goverment)
- Trimbakeshwar | ‘दुष्काळाचे सावट दूर होवुदे’; पालकमंत्र्यांचे निवृत्तीनाथांना साकडे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम