Nashik | त्र्यंबकेश्वर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते ‘कर्मवीर रावसाहेब थोरात वाचन’ कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या वाचन कट्ट्याच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या विद्यार्थी कट्ट्यावर आणि कॅन्टीन मधील टेबलांवर विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली असून विद्यार्थी फावल्या वेळेत यातून हवी ती पुस्तके घेऊन वाचू शकणार आहेत.(Nashik)
दरम्यान, “वाचन संस्कृती रुजविण्यासाठी कॉलेज कट्ट्यावर ‘वाचन कट्टा’ हा अभिनव उपक्रम असून, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाभिरुची निर्माण होऊन ज्ञान, व्यासंग वाढीसाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल.” असे मत यावेळी सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले. त्यांनी या अभिनव उपक्रमास शुभेच्छा देऊन प्रशंसाही केली.
Nashik | युवा हा देशाची ताकद अभिमान आणि स्वाभिमान – मंत्री दादा भुसे
तसेच, याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी कॉलेज कॅन्टीनचे उद्घाटन सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. तसेच यावेळी या महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी ब्युटी केअर असिस्टंट कोर्स, भाषा, सामाजिकशास्रे, विज्ञान तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणि भूगोल दिनाचे औचित्य साधून, नाविन्यपूर्ण विषयांच्या पोस्टरच्या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास मोरे, संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, ॲड. लक्ष्मण लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष ॲड.भास्कर मेढे, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार आदी उपस्थित होते.(Nashik)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम