Nashik Monsoon Tourism | नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर; पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी, हुल्लडबाजांवर कारवाई

0
64
Nashik Monsoon Tourism
Nashik Monsoon Tourism

नाशिक :  पावसाळ्यात दूरदूरहून पर्यटक नाशिकमध्ये पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तालुक्यात निसर्गाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. येथील सुप्रसिद्ध असलेल्या भावली धरण धबधबा (Bhavali Dam Waterfall) आणि पहिने धबधब्यावर (Pahine Waterfall) पर्यटक विशेषकरून येतात. या पार्श्वभूमीवर याठिकाणी हुल्लडबाज पर्यटकांवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) मोठी कारवाई केली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी अंजनेरी येथे काही पर्यटक अडकल्याची आणि लोणावळा (lonavala) येथेही एकाच कुटूंबातील पाच जणांचा पाण्यात वाहून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अशी कुठलाही अनुचित प्रकार नाशिकमध्ये घडू नये. यासाठी नाशिकमधील धबधबे, धरण यांसारख्या पर्यटन स्थळांवर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) निर्बंध जारी केले आहे. तर, नाशिकच्या भावली धरण येथेही पर्यटकांचा हुल्लडबाजी करतानाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर नाशिक ग्रामीण पोलीसांकडून हे निर्बंध जारी करण्यात आले आहे. (Nashik Monsoon Tourism)

Nashik News | नाशिक हादरलं..! जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच वृद्धाला जिवंत जाळले

Nashik Monsoon Tourism | विकेंडला पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी 

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर येथे पोलिसांनी हुल्लडबाज पर्यटकांची तपासणी केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 90 जणांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून 73 हजारांचा दंड वसूल केला आहे. तसेच विकेंडला पर्यटकांना इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरच्या पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. (Nashik Monsoon Tourism)

पर्यटन स्थळांवर असणार पोलिसांचे पथक 

या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करणे, धोकादायक ठिकाणांवर गर्दी करणे, अशा घटना समोर आल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर निर्बंध लावले असून, पर्यटन स्थळांवर पोलिस पथकदेखील तैनात करणार असल्याचे म्हटले आहे.

Nashik News | नाशिकमध्ये प्रेम प्रकरणातून महिलेने पोलिस स्टेशनसमोरच कापली हाताची नस


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here