Nashik News : नाशिकमध्ये प्रेमप्रकरणातून एका विवाहितेने पोलिस स्टेशन समोरच हाताची नस कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना नाशिक शहरातील सातपूर भागात घडली असून, या महिलेने सातपूर पोलीस स्टेशन (Satpur Police Station) समोरच हाताची नस कापत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
अधिक माहितीनुसार, नाशिक शहरातील सातपूर (Satpur) पोलीस स्टेशन समोरच एका विवाहित महिलेने प्रेम संबंधांतून हाताची नस कापत आत्महत्येचा प्रयत्न केला. तर, या महिलेने एक सुसाइड नोटही लिहली असून, यात आत्महत्येमागील कारण सांगितले आहे. दरम्यान, या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास येताच सातपूर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. या महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. (Nashik News)
Nashik Crime News | नाशिकमधील नामांकित महाविद्यालयाची शिपायाकडून फसवणूक; लाखोंची हेराफेरी
Nashik News | सुसाईड नोटमध्ये काय..?
दरम्यान, या महिलेने सुसाईड नोटमध्ये लिहळे आहे की, तिचे एका तरुणासोबत प्रेम प्रकरण होते. या तरुणाने प्रेमाचा विश्वास दाखवून तिच्याकडून एक लाख रुपये घेतले. त्यामुळे या महिलेच्या आई वडिलांनी व मुलाने तिच्यासोबत संबंध तोडले. यामुळे हि महिला तिच्या प्रियकराच्या घरी राहत होती. मात्र, प्रियकराच्या आईने तुला माझ्या मुलाशी लग्न करायचे असेल तर आधी तुला तुझ्या मुलाला सोडावे लागेल, असे सांगितले. तर, प्रियकरानेही तिला विश्वासात घेत मी तुझ्या नावावर घर करतो, असे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर प्रियकराने या महिलेला सोडून दिले. दरम्यान, प्रियकराने सोडल्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे महिलेने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. (Nashik News)
Nashik News | चांदवडमध्ये राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या गाडीला अपघात; एकाच मृत्यू, ३ गंभीर जखमी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम