सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | देवळा पोलिस ठाणे अंतर्गत गणेशोत्सव सण शांततेत पार पडावा यासाठी शांतता समितीची तालुकास्तरीय बैठक आज दि. ५ रोजी देवळा येथील सुराणा पतसंस्थेच्या सभागृहात तहसिलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, देवळा पोलिस ठाण्याचे सह. पोलिस निरिक्षक दिपक पाटील, तसेच विज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र देवरे, सार्वजनिक बाधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता रोशन आहिरे, पोलिस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
Deola | डेंग्यु सदृश्य परिस्थितीवर ग्रामस्तरावर उपाययोजना राबवा; आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील
यावेळी उपस्थित असलेल्या देवळा तालुक्यातील विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष व सदस्यांना मार्गदर्शन करतांना सह. पोलीस निरीक्षक दीपक पाटील म्हणाले की, मंडळांनी रीतसर ऑनलाइन फाॕर्म भरुन पोलीस विभागाकडून परवानगी घ्यावी, उत्सव काळात शांततेचा भंग होणार नाही, तसेच जातीय तेढ निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, कुणाकडुनही जबरदस्तीने वर्गणी गोळा करु नये, मिरवणुकीत वाहन पुढे मागे घेतांना काळजी घ्यावी. आदी सुचना करत सर्वांनी ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे. असे आवाहन दिपक पाटील यांनी यावेळी उपस्थितांना केले.
Deola | देवळ्यात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
Deola | विद्युत अपघात टाळावेत- अभियंता जितेंद्र देवरे
विद्युत मंडळाकडुन तात्पुरती विद्युत जोडणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा मंडळांनी लाभ घेऊन विद्युत अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच चांगल्या प्रतीचे इलेक्ट्रिक साहित्य वापरावे. आदी माहिती विज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र देवरे यांनी दिली.
चालुवर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने विशेषतः गिरणा नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने गणपती विसर्जनासाठी कुणीही नदीत खोलवर जाऊ नये. संभाव्य धोक्याच्या ठिकाणी दोर, फलक लावण्यात यावे जेणेकरून कुठलीही हानी होणार नाही. अशा सूचना यावेळी देवळा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिल्या. यावेळीं पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष योगेश वाघ, भगवंत जाधव, गुप्तचर विभागाचे रविराज बच्छाव, सर्व पोलीस पाटील, गणेश मंडळाचे अध्यक्ष इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Deola)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम