Deola | देवळा तालुक्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

0
106
Deola
Deola

Deola | देवळा तालुक्यातील निंबोळा येथील शेतकरी बळीराम देवराम देवरे (वय ५०) यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. (Farmer Suicide) या घटनेने निंबोळा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देवळा तालुक्यातील निंबोळा येथील शेतकरी बळीराम देवराम देवरे यांच्याकडे दोन एकर जमीन असून, त्यांनी मालेगाव येथील भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे १५ लाख रुपये आणि पिरॅमिल फायनान्सचे १७ लाख रुपये असे एकूण ३२ लाख रुपयांचे कर्ज घेतलेले होते.(Deola)

Deola | भावडबारी ते देवळा महामार्गाच्या अर्धवट कामाचा नागरिकांना ताप; उबाठा गटाचा आक्रमक पवित्रा

मात्र, शेती मालाला भाव नसल्याने देवरे हे कर्ज फेडू शकले नाही. या कर्जाला कंटाळून त्यांनी गुरुवारी (दि.५) रोजी घरी (शेतात) विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली. मयत देवरे यांच्यावर मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन गुरुवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुन, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेचा तलाठी अविनाश गावित यांनी पंचनामा केला असून, मालेगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here