Nashik Loksabha | मराठ्यांना नडल्याचे परिणाम; अजित दादांनीच भुजबळांना दूर लोटले

0
15
Nashik Loksabha
Nashik Loksabha

Nashik Loksabha |  राज्यात सध्या आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आले असून, सर्वच पक्ष आता प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. दरम्यान, या निवडणुकांसाठी अजित दादांनी मोठा धुरळा उडवला असून, त्यांनी मध्यंतरी त्यांच्या पक्षाच्या जिल्हाधिकाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले होते. अजित पवार गटातर्फे जिल्हाधिकारी आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकांच्या प्रचारासाठी बोलेरो आणि स्कॉर्पिओ गाड्या देण्यात आल्या होत्या. दरम्यान, आता अजित दादांनी नाशिकवर विशेष लक्ष दिल्याचे दिसत असून, अजित दादा नाशिकसाठी एका नव्या उमेदवाराचा शोध घेत असल्याचे दिसत आहे.(Nashik Loksabha)

यासाठी अजित पवारांनी त्यांच्या नाशिकमधल्या कार्यकर्त्यांना सूत्र फिरवायला सांगितले आहे. दरम्यान, त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या चेहऱ्यांसोबत गाठीभेटी देखील झाल्या असल्याची माहिती आहे. मात्र, अजित पवारांच्या ह्या निर्णयामुळे भुजबळ आणि पवारांमध्ये काही बिनसलंय का? आणि आता आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीसाठी तयार असलेल्या समीर भुजबळांचे काय? महायुती सरकारच्या कुठल्या पक्षाच्या वाट्याला नाशिक येणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (Nashik Loksabha)

Nashik | मोदींच्या नाशिक दौऱ्यात गोदा महाआरतीची घोषणा होणार?

दरम्यान, याआधी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कौल पाहता नाशिकची जागा ही अजित पवार गटाला मिळावी ही पक्षाच्या स्थानिक पधाधिकाऱ्यांची इच्छा आहे. मात्र, विद्यमान खासदार हा शिंदे गटाचा असून भाजप आणि शिंदे गटात धुळे आणि नाशिकबाबत अदलाबदल झाल्याची चर्चा मधल्या काळात सुरू होती. मग आता अजित पवार नवीन चेहऱ्याचा शोध का घेत आहेत. या सर्व गोष्टी बघता लोकसभेआधी नाशिकमध्ये काही राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत.(Nashik Loksabha)

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नाशिकमधील पदाधिकारी शिवाजी सहाणे यांची निवड अजित दादांनी केली असल्याची माहिती अमोर येत आहे. त्यानुसार त्यांची कामे ही सुरू आहेत. मात्र, ही कामे लोकसभेसाठी आहे की नाही, हे अजून स्पष्ट नाही. मात्र आता अजित दादांच्या या नव्या चेहऱ्यामुळे माजी खासदार समीर भुजबळांचा पत्ता कट होणार का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (Nashik Loksabha)

Chhagan Bhujbal | ‘त्यांच्या’ पत्नीने माझ्याकडे हात जोडले; भुजबळांची जहरी टिका

Nashik Loksabha | भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोधाचे परिणाम  

मराठा विरुद्ध ओबीसी आणि छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे हा वाद सध्या राज्यभरात वानव्यासारखा पेटलेला असून, याचे पडसाद आता जिल्ह्याच्या राजकारणात आणि अजित पवार गटातही भुजबळांच्या विरोधात उमटल्याचे दिसत आहे.(Nashik Loksabha)

१. छगन भुजबळांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आणि त्यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली.

२. पहिली ओबीसी एल्गार सभा झाली आणि विजय वडेट्टीवारांनी त्यांची साथ सोडली.

३. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी ते जाणार असल्याचे कळाले आणि त्यांच्याच मतदार संघातील लोकांनी त्यांना ‘आमच्या बांधांचा सातबारा हा आमच्या नावावर आहे आणि यामुळे तुम्ही आमच्या बांधावर येऊ नये” असे ठणकावले आणि त्यांना बांधावर येण्यासही मनाई केली.

४. एवढेच नाही तर, पाहणी झाल्यानंतर मंत्री भुजबळांचा ताफा गेला आणि गावकऱ्यांनी चक्क त्या वाटेवर गोमूत्र शिंपडले.(Nashik Loksabha)

५. हिंगोलीत त्यांच्या एल्गार सभेला जेमतेम ५०-६० लोकांची उपस्थिती असक्याने भुजबळांनी सभेला येणे टाळले आणि यासाठी तब्येतीचे कारण पुढे केले.

६. आणि आता यामुळेच समीर भुजबळांना टाळत अजित पवार नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याचे सांगण्यात आले आहे.

७. भुजबळांच्या विरोधात लासलगाव- येवला मतदार संघातून छावा संघटनेच्या करण गायकर हे मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले अन् जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांना पाठिंबा दर्शविला व गायकर यांना निवडून आणण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू असेही जाहीर केले.

त्यामुळे वरील ही सर्व भुजबळांच्या विरोधातील जिल्ह्यातील परिस्थिती बघताच अजित पवारांनी समीर भुजबळांना डावलून नव्या उमेदवाराचा शोध घेत असल्याची चर्चा आहे. (Nashik Loksabha)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here