Nashik Lok Sabha Result | नाशिक, दिंडोरीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचीच आघाडी कायम 

0
29
Nashik Lok Sabha Result
Nashik Lok Sabha Result

Nashik Lok Sabha Result |  नाशिक आणि दिंडोरी लोकसभेची निवडणूकीचे मतदान २० मे ला पार पडले होते. त्यानंतर आज मंगळवारी ४ जूनला मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. निकालाचा आढावा त्याद्वारे मिळत आहे. सकाळी आठ वाजेपासून शहरातील अंबड परिसरातील वेअर हाउसमध्ये दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीचे काम सुरू आहे.

Nashik Lok Sabha Result | राजाभाऊ वाजेंचीच आघाडी कायम 

आज सकाळी आठ वाजेपासून मतदानमोजणी सुरुवात झाली असून नाशिक लोकसभेत मविआचे उमेदवार राजभाऊ वाजे हे सुरुवातीपासून आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तिसऱ्या फेरीच्या अखेरीस नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांना ३० हजार ४८० मतांची आघाडी मिळाली होती. तर चौथ्या फेरीत राजाभाऊ वाजे यांना ३६ हजार ३४० मतांनी आघाडी मिळत असल्याचे चित्र आहे. चौथ्या फेरीत राजाभाऊ वाजे यांनी १ लाख १५ हजार ७०९ मते मिळवली आहेत. तर हेमंत गोडसे यांना ७९ हजार ३६९ इतकी मते मिळाली आहेत.(Nashik Lok Sabha Result)

Dindori Lok Sabha Result | ड्यूप्लिकेट भगरे सरांनी घेतली ओरिजिनल भगरे सरांची मोठी मतं..?

उत्तर महाराष्ट्रात मविआचीच चलती 

दरम्यान, नाशिक लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे, शिंदे शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज या तिघांमध्ये तिरंगी लढत असल्याचे दिसत आहे. तर दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे आणि भाजपच्या पक्षाच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यात लढत सुरू आहे. नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांनी मोठी आघाडी घेतली असून, विद्यमान खासदार हीना गावीत यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. (Nashik Lok Sabha Result)

Lok Sabha Election Result | देशाचा कौल कोणाकडे; दिल्लीच्या तखतावर कोण बसणार..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here