Dindori Lok Sabha Result | ड्यूप्लिकेट भगरे सरांनी घेतली ओरिजिनल भगरे सरांची मोठी मतं..?

0
78
Dindori Lok Sabha Result
Dindori Lok Sabha Result

Dindori Lok Sabha Result | दिंडोरी लोकसभा मतदार संघात सुरुवातीला ही लढत चौरंगी होणार असल्याचे दिसत होते. माकपचे जे पी गावीत आणि भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही लढत चौरंगी होणार असल्याचे दिसत होते. मात्र या दोघांनीही शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने ही लढत दुरंगी झाली. मात्र, यात एक वेगळाच ट्विस्ट बघायला मिळाला.

नवखा आणि अनोळखी उमेदवार थेट तिसऱ्या क्रमांकावर

शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या नावाशी मिळते जुळते नाव असलेल्या एका अपक्ष उमेदवारालाही सर ही पदवी देण्यात आली. त्यामुळे चक्क एक नवखा आणि अनोळखी उमेदवार आता थेट तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसत आहे. दिंडोरी लोकसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे तिसऱ्या फेरी अखेर ६,९८९ मतांनी आघाडीवर असून, त्यांच्या आडनावात साम्य असलेले उमेदवार बाबू सदू भगरे सर यांना चक्क १२,३८९ मते मिळाली आहेत. दिंडोरीत एकच आडनाव असलेल्या उमेदवारामुळे नाट्यमय वळण मिळण्याची शक्यता आहे. (Dindori Lok Sabha Result)

Lok Sabha Election Result | देशाचा कौल कोणाकडे; दिल्लीच्या तखतावर कोण बसणार..?

Dindori Lok Sabha Result |  ‘सर’ ही पदवी देण्यात आल्याने गोंधळ

शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे पेशाने शिक्षक असून, त्यांना ‘सर’ असे म्हटले जाते. तर, त्यांच्या नावाशी मिळतेजुळते नाव असलेल्या बाबू सदू भगरे या उमेदवारालाही सर ही पदवी देण्यात आल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचे स्पष्ट असून, हा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर असून, त्यांना १२,३८९ मते मिळाली आहेत.(Dindori Lok Sabha Result) मात्र, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भास्कर भगरे हे सध्या १३,३६७ मतांनी आघाडीवर आहेत.

Dindori Lok Sabha Result | भारती पवारांना मोठा धक्का; मोठ्या फरकाने भगरेंची आघाडी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here