Nashik Lok Sabha | यंदा निवडणुकांचा प्रचार महागला; व्हेज आणि नॉनव्हेज थाळींचेही दर ठरले

0
25
Nashik Lok Sabha
Nashik Lok Sabha

Nashik Lok Sabha | लोकसभा निवडणूकांच्या तारखा या आता कधीही जाहीर होऊ शकतात. अशी परिस्थिती असताना निवडणूक आयोगाने उमेदवारांना प्रचारासाठीचे दर ठरवून दिले आहे. तर, यावेळी प्रचार देखील महागला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांचे प्रति किलो मीटरप्रमाणे दर निश्‍चित करण्यात आले आहे. यासाठी व्हेज जेवणाचे दर हे १५० रुपये, तर नॉनव्हेज जेवणाचे दर हे २५० रुपये असे आहेत. तर रिक्षाचे दर हे २४० किलोमीटरसाठी ८८० रुपये आणि १२० किलोमीटरसाठी ४४० रुपये दर असे ठरविले आहे.

उमेदवारांच्या सर्व खर्चांवर नजर ठेवणार

एवढेच नाहीतर जीप, टेम्पो, टॅक्सी, बोलेरो, टाटा व्हीक्ट्रा, क्वालिस, तवेरा या गाड्यांसाठी प्रतिदिन २४० किलोमीटरसाठी २,७५० आणि १२० किलोमीटरसाठी १,३७५ रुपये असा दर निश्‍चित केला असून, मागील निवडणुकींपेक्षा यावेळी प्रचार दरात वाढ झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत  निवडणूक आयोग यंदा उमेदवारांच्या सर्व खर्चांवर नजर ठेवणार असून, उमेदवाराला दररोज निवडणूक विभागाला खर्च सादर करावा लागणार आहे.(Nashik Lok Sabha)

याकरिता सर्व कामांचे दर हे ठरवून दिलेले आहेत. निवडणूकींसाठी प्रचारात वापरल्या जाणाऱ्या १२५ केव्ही जनरेटरची किंमत ही प्रति दिन १५ हजार रुपये, लाउडस्पिकर, माईक, अ‍ॅम्पिलीफायरसाठी प्रतिदिन ६ हजार रुपये, ट्यूबलाइट ५० रुपये, हॅलोजन ७० रुपये, फॅन १३ रुपये, कुलर २५० रुपये, एलईडी टीव्ही ११९५ रुपये यासह लॅपटॉप, एलईडी व्हॅन, ड्रोन कॅमेरा इत्यादींचेही दर निश्चित केलेले आहे.

Lok Sabha Election | सरकारची निवडणुक घाई; दोन दिवसांत ‘जीआर’चा धडाका

निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून हे सर्व दर निश्चित केले आहे. तसेच उमेदवारांच्या बैठका, सभा, रॅली अशा प्रत्येक ठिकाणी प्रशासनाचे व्हिडिओ हे सर्व्हेलन्स पथक उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवणार आहे. याखेरीज व्हिडिओ व्ही विंग पथक, खर्च निरीक्षक हेदेखील उमेदवाराच्या सादर केलेल्या खर्चावर व पथकाने नोंदविलेल्या खर्चाची पडताळणी करणार आहे. उमेदवाराच्या खर्चात हा खर्च मोजला जाणार आहे.(Nashik Lok Sabha)

हार, तुऱ्यांचे दर ठरले

फुलांच्या हार आणि तुऱ्यांचे दर ठरले आहेत. प्रचार व मेळाव्या दरम्यान उमेदवार हे अडीच फुटांच्या सफारी आणि हारासाठी १३० रुपयांचे दर ठरवले आहे. तर सात आणि नऊ फुटांच्या हारासाठी ४५० रुपयांचा दर ठरवला आहे. (Nashik Lok Sabha)

Lok Sabha Elections Date | आगामी लोकसभा निवडणुकांबाबत मोठी घोषणा…

Nashik Lok Sabha | असे आहेत पदार्थांचे दर

चहा – ६ रुपये प्रति कप

कॉफी – १२ रुपये प्रति कप

वडापाव – १२ रुपये

भजी, पोहे, कचोरी, फरसाण – १५ ते २० रुपये

शाकाहारी थाळी – १५० रुपये

नॉन व्हेज थाळी – २५० रुपये(Nashik Lok Sabha)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here