Nashik Lok Sabha | तिकीटाच्या शर्यतीतून भुजबळांची माघार; मोदी, शाहांचे मानले आभार

0
50
Nashik Lok Sabha
Nashik Lok Sabha

Nashik Lok Sabha | आज राज्यातील पाच लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर, दुसरीकडे मात्र, अजूनही महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या वादातून आता अचानक मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. या जागेवरुन महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू होती. एकीकडे विद्यमान खासदार हेमंत गोडसे तर, दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ हे दोघेही उमेदवारीसाठी कमालीचे आग्रही होते. या पार्श्वभूमीवर मंत्री भुजबळ यांनी त्यांचे जिल्हा बँकेतील कर्जाचे हप्ते भरायला सुरुवात केली होती. तर, दुसरीकडे हेमंत गोडसे यांनी तर थेट प्रचारालाच सुरुवात केली आहे. मात्र, यात आता मोठा ट्विस्ट आला असून, मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आपण लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. (Nashik Lok Sabha)

भुजबळांनी सांगितली नाशिकच्या उमेदवारीची कहाणी

मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली असून, यावेळी ते म्हणाले की, “देशात सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. काही ठिकाणी महायुतीची उमेदवारी कुणाला मिळेल याबाबत चर्चा सुरू आहे. नाशिकच्या जागेबाबत होळीच्या दिवशी आम्हाला अजित पवारांचा निरोप आला होता. आम्ही दिल्लीहून आलो आणि तिथे आमची अमित शाहांसोबत वाटपाबाबत चर्चा झाली. थेट अमित शाह यांनी सांगितलं की नाशिकमधून छगन भुजबळ यांना उभे करा. तर, त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, तिथे हेमंत गोडसे हे आमचे उमेदवार आहेत.(Nashik Lok Sabha)

Nashik Lok Sabha | गोडसेंच्या प्रचारपत्रकावर राज ठाकरे; गोडसेंचे आणि मनसेचे नाते काय..?

मात्र, अमित शाह म्हणाले की, आम्ही त्यांना समजावून सांगू. त्यानंतर आम्ही मतदारसंघात जाऊन याबाबत आढावा घेतला. आम्हाला वातावरण चांगलं वाटलं. अल्पसंख्याक ओबीसी समाज हे आमच्या बाजूने असल्याचंही लक्षात आले. त्यानंतर बातमी फुटली आणि माझ्या उमेदवारीची बातमी माध्यमातून समोर आली. हे सूरू झाल्यानंतर मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांकहीसओबात फोनवरून चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, अमित शाह यांनी तुम्हाला लोकसभा निवडणूक लढावी लागेल असे सांगितलं आहे. त्यानंतर आता तीन आठवडे गेले. मात्र, अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही.(Nashik Lok Sabha)

Nashik Lok Sabha | उद्या राष्ट्रवादी भुजबळांच्या नावाची घोषणा करणार..?

Nashik Lok Sabha |  मी या निवडणुकीतून माघार घेत आहे  

गेल्या तीन आठवड्यापासून महाविकास आघाडीचे उमेदवार मतदार संघात फिरत आहे. त्यांचा प्रचार देखील पुढे गेला आहे. उमेदवारीचा निर्णय घ्यायला जेवढा वेळ लागेल. तेवढ्याच नाशिकच्या जागेवर महायुतीच्या अडचणी वाढत जाणार आहे. सध्या याबाबत जो काही संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी मी आज ही पत्रकार परिषद घेत असून, मी या लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे. मी राज्यभरात उमेदवारांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. मी आता महायुतीची शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असून, मला आत्तापर्यंत ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानतो. मोदी साहेबांनी आणि अमित शाह यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो, असे छगन भुजबळ याआणि आज जाहीर केले. (Nashik Lok Sabha)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here