Nashik | नाशिकमध्ये पुन्हा ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट

0
18
Nashik
Nashik

Nashik | गेल्या वर्षात ऑक्टोबर महिन्यात राज्यभर गाजलेले ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरण आणि त्यानंतर सलग सुरू असलेले राजकीय बड्या नेत्यांचे दौरे आणि लागोपाठ घडत असलेल्या राजकीय घडामोडी यामुळे नाशिक हे सध्या चर्चेत आहे. ऑक्टोबर महिन्यात नाशिकच्या शिंदे गावात मुंबई पोलिसांनी धाड टाकली आणि तेथील ड्रग्ज कारखाना उध्वस्त केला.

त्यानंतर लागोपाठ सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, पालघर, पुणे अशा अनेक मोठमोठ्या शहरांत छापे टाकत पोलिसांनी एमडी ड्रग्ज आणि अवैध धंद्यांविरोधात कारवाया केल्या होत्या. याद्वारे कोट्यवधींचा माल आढळल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, फरार ड्रग्ज माफिया ललित पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, यामुळे नाशिकचे ड्रग्स प्रकरण हे राज्यभरात चांगलेच पेटले होते. यावरून विरोधकांनीही चांगलीच वातावरण निर्मितीही केली होती. (Nashik)

Nashik | युवा हा देशाची ताकद अभिमान आणि स्वाभिमान – मंत्री दादा भुसे

दरम्यान, आता नाशिकमध्ये पुन्हा ड्रग्स सापडले आहेत. नाशिकच्या पाथर्डी शिवारात पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून तब्बल एक लाख रुपयांचे २० ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर ही हस्तगत करण्यात आलेली आहे. निखिल पगारे आणि कुणाल घोडेराज अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मात्र, यामुळे अजूनही नाशिकमध्ये ड्रग्स साखळी सुरू असल्याचे उघड झाले आहे. इंदिरा नगर पोलिस हे या प्रकरणाची सविस्तर चौकशी करत आहेत. (Nashik)

 Nashik | अशी होती पोलिसांची कारवाई 

नाशिकच्या शिंदे गावात एकापाठोपाठ एक असे तब्बल दोन एमडी ड्रग्ज निर्मिती होत असलेले कारखाने उघडकीस आले होते. दारम्यान, पहिला कारखाना हा मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी आणि दुसरा नाशिक पोलिसांकडून उद्‌ध्वस्त करण्यात आला होता. याआधीही नाशिकच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आणि नाशिक गुन्हे शाखेने १२ ड्रग्ज पेडलरला ताब्यात घतेले होते. (Nashik)

PM Modi in Nashik | आई बहिनींवरून शिवीगाळ करू नका – पं. मोदी

ड्रग्स माफिया ललित पाटील हा २०२० पासूनच पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र, काही आरोग्याच्या कारण देऊन तो पुण्याच्या ससून रुग्णालयात पाहुणचार घेत होता.या ससून रुग्णालयातून तो २ ऑक्टोबरला फरार झाला होता. त्यानंतर मग पुणे पोलिसांनी आरोपी ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याच्यासह आणखी एकाला उत्तर प्रदेशमधून अटक केली होती. त्यानंतर ललित पाटील याच्या साकीनाका पोलिसांनी तामिळनाडू येथे मुसक्या आवळल्या होत्या.

यानंतर, ललित पाटील याने मध्यमांसमोर “मला अडकवले गेले आहे. मी पळालो नाही तर मला पळवलं गेलं होतं”. अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टिका युद्ध सुरू झाले होते. यात अनेक नेत्यांवर आरोपही करण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत होते. (Nashik)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here