Nashik | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशिक दौऱ्यानंतर नशिकमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. दरम्यान, यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी नाशिक दौर्यावर येत आहेत. तर, त्यांच्या हस्ते आमदार देवयाणी फरांदे यांच्या मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातील मेळा बसस्थानकाचे उद्घाटन होणार आहे. यासह त्यांच्या हस्ते नाशिकमधील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दरम्यान, या सोहळयासाठी नशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे तसेच अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार हे उपस्थित असणार आहेत.(Nashik)
Manoj Jarange | असा आहे मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा कसमादे दौरा
Nashik | या विकास कामांचे उद्घाटन
१. मेळा बस स्थानकाचा संध्याकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
२. या सोहळ्यानंतर फडणवीस यांच्या जाहीर सभेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
३. यावेळी काही विकास कामांचेही ऑनलाईन उदघाटन करण्यात येणार आहे.
४. अपंगांसाठी बांधलेल्या राज्यातील सर्वात मोठे ‘दिव्यांग भवन’ अटल स्वाभिमान भवनचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
५. नाशिक येथे शिक्षण घेणार्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विभागाकडून बांधण्यात येणार्या नर्सिंग वासतिगृहाचे भूमिपूजन ऑनलाइन पद्धतीने होणारआहे.
६. ‘प्रमोद महाजन गार्डन’च्या नूतनीकरणाचे भूमिपूजन हे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
७. ‘संत गोरोबाकाका कुंभार’ यांच्या राज्यातील एकमेव मंदिराचे आणि सभामंडपाचे भूमिपूजन.
८. ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत जुने नाशिक परिसरात बांधण्यात आलेल्या ‘स्व. सुरेश मानकर जलकुंभ’ आणि ‘हुतात्मा आनंद कान्हेरे मैदान’ येथे बांधण्यात आलेल्या ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जलकुंभ’ या कामांचेही उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे.(Nashik)
९. स्मार्ट सिटी अंतर्गत तयार केलेल्या ‘स्मार्ट स्कूल’चे देखील उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
दरम्यान, या सोहळयासाठी मतदार संघातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केले आहे.
NCP | राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगाच्या निकालात नवा ट्विस्ट
असा आहे देवेंद्र फडणवीस यांचा ‘नशिक दौरा’
शनिवारी (दि. १०) रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नशिक दौऱ्यावर येणार असून, असा आहे त्यांचा नशिक दौरा.
१. दुपारी अडीच वाजता देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन होणार आहे.
२. तेथून ते पंचवटीतील नाट्यगृहाचे उदघाटन करणार आहे.
३. त्यानंतर मॅरेथॉन चौकात ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या रथाचे उदघाटन.
४. दुपारी ४ वाजता ‘राज्यस्तरीय पोलीस क्रिडा’ स्पर्धेच्या समारोप सोहळयाला ते उपस्थिती.
५. सायंकाळी साडे सहा वाजता सातपूर पोलीस स्टेशनच्या नुतन इमारतीचे उदघाटन.
६. त्यानंतर ते मेळा बस स्थानकाचे उद्घाटन करणार आहेत.
७. या नंतर त्यांची जाहीर सभा होर असून, ते येथे सभेला संबोधित करतील.
८. तर, रात्री साडे आठ वाजता ओझर विमान तळावरून ते मुंबईकडे रवाना होतील.(Nashik)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम