Ketaki Mategaonkar | सालाबादाप्रमाणे यावर्षीही ‘नाशिक महानगर पालिका उद्याने आणि वृक्ष प्राधिकरण’ विभागाच्या वतीने ९ ते ११ फेब्रुवारी याकाळात पुष्पोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ४ वाजता नशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते या पुष्पोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तर, या सोहळ्यासाठी मराठी अभिनेत्री तथा गायिका केतकी माटेगावकर याही उपस्थित असणार आहेत.
१९९६ पासून नशिक महापालिका या पुष्पोत्सवाचे आयोजन करते. त्यानुसार यावर्षी ९ ते ११ फेब्रुवारी रोजी हा पुष्पोत्सव आयोजित केलेला आहे. तर, या पुष्पोत्सवासाठी विविध गटातून १,७९७ प्रवेशिका प्राप्त झाल्या असून, या प्रदर्शनात ४२ नर्सरी स्टॉल तसेच २० फुड स्टॉल्सचे आतापर्यंत बुकिंग झाले आहे. महानगर पालिका मुख्य इमारतीच्या तिन्ही मजल्यांवर विविध गटांची मांडणी करण्यात येणार आहे.(Ketaki Mategaonkar)
Nashik | असा आहे देवेंद्र फडणवीस यांचा ‘नशिक दौरा’
दरम्यान, यात गुलाब, मोसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्साय, कॅक्टस, शोभेच्या कुंड्या ठेवल्या जाणार आहेत. तसेच, उद्या उदघाटनाच्या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मानांकनाची बक्षिसेही वितरीत करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील दोन दिवस हे पुष्प प्रदर्शन नागरिकांसाठी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत खुले असणार आहे. तर, ११ फेब्रुवारीला समारोप असून, यादिवशी अभिनेता किरण गायकवाड, अभिनेत्री शिवानी बावकर हे उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते यावेळी विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.
Ketaki Mategaonkar | सायकल रॅलीचेही आयोजन
या पुष्पोत्सवाच्या प्रदर्शनानिमित्त उद्या ९ फुब्रुवारी रोजी सायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. तर, सकाळी साडेसहा वाजता गणेशवाडी फुल बाजार येथून ही सायकल रॅली सुरू होणार आहे. तर, या रॅलीतून पर्यावरणाचा संदेश देण्यात येणार आहे.(Nashik)
Nashik News | मालेगावचा ‘मिनी पाकिस्तान’ उल्लेख करणे राणेंना महागात पडले
सेल्फि पॉईट अन संगीत मैफील
प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारावरच फुलांची आकर्षक कमान उभारण्यात येणार असून, येथे प्रांगणात ‘सेल्फी पॉईंट’ देखील उभारण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण हे ‘मिनीएचर लॅन्डस्केपिंग’ असणार आहे. तर, १० फेब्रुवारीला सकाळी निसर्ग आणि फुलांवर आधारीत ‘कविता सत्र’ तसेच संध्याकाळी साडे सहा वाजता ‘संगीत मैफील’ही रंगणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता अमित माळी हे ‘संगीत रजनी’ प्रस्तुत करणार आहेत. तर, पुष्प स्पर्धे व्यतिरिक्त सहभागी नाशिककरांकडून निसर्गावर आधारित पेंटींग आणि फुलांची माहिती देणारे छायाचित्रांचेही प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. (Ketaki Mategaonkar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम