Masik Shivratri | आज ‘मासिक शिवरात्री’च्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी

0
46
Masik Shivratri
Masik Shivratri

Masik Shivratri | आज वर्षातील दुसरी मासिक शिवरात्री आहे. या दिवशी शिवभक्त भगवान शंकराच्या संपूर्ण कुटुंबाची पूजा करतात. आध्यात्मिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री शिवलिंग रूपामध्ये भगवान शंकराचा जन्म झाला होता. त्यामुळे आजच्या म्हणजेच मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवभक्तांनी भगवान शंकराची पूजा करावी. तसेच त्यांच्या या जन्माची कथा वाचावी. तर जाणून घेऊयात आजच्या मासिक शिवरात्रीचे महत्त्व, कथा आणि पूजाविधी…

Masik Shivratri | असा आहे आजचा शुभ मुहूर्त

  • ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी या तिथीला सुरूवात होते.
  • तर, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजून २ मिनिटांनी समाप्ती होते.
  • आजच्या या मासिक शिवरात्रीच्या पूजेसाठी सकाळी ५ वाजून २१ मिनिटे ते ६ वाजून १३ मिनिटांचा ब्रह्म मुहूर्त आहे. (Masik Shivratri)

Shattila Ekadashi | आजच्या ‘षटतिला एकादशी’ला हे उपाय कल्याने होईल धनलाभ

अशी आहे व्रत पद्धती

  • आजच्या म्हणजेच मासिक शिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून, आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत.
  • त्यानंतर सूर्य देवाला जल अर्पण करावे.
  • गंगाजल शिंपडून देवघर शुद्ध करा.
  • एका चौरंगावर शिवलिंग किंवा शिव कुटुंबाचे चित्र ठेवावे.
  • त्यानंतर भगवान शंकराला पाणी, कच्चे दूध, गंगाजल, बेलपत्र, धतुरा, भांग, फळे, फुले अर्पण करा आणि अगरबत्ती दिवा लावत पूजन करा.
  • शक्यतो तुपाचा दिवा लावावा. (Masik Shivratri)
  • यानंतर ‘शिव चालिसा’ किंवा भगवान शंकराच्या मंत्रांचा जप करा.
  • आणि शेवटी भगवान शंकराची आरती करून प्रसाद ग्रहण करा.
  • प्रदोष व्रतामध्ये भगवान शंकरासह देवी पार्वतीचीही पूजा करावी.
  • तसेच प्रदोष व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी आरती करून फलाहार घ्यावा.

 काय करावे आणि काय करू नये

  • शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा कधीही करू नये.
  • शिवरात्री व्रत करत असाल तर, त्या दिवशी कोणासाठीही अपशब्द वापरू नये.
  • तसेच थोरामोठ्यांचा अपमान करू नये.
  • आजच्या मासिक शिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी कोणीही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये.
  • सोबतच आजच्या दिवशी गहू, डाळ तसेच तांदूळ हे धान्य दान करू नये.
  • आजच्या मासिक शिवरात्रीचे व्रत करत असणाऱ्याने तामसिक गोष्टींपासून दूर राहावे.
  • तसेच आज पंचामृत तयार करताना तुळशीचा वापर करू नये.(Masik Shivratri)
  • आज भगवान शंकराला तीळ अर्पण करू नये.

Trigrahi Yoga | कोणत्या राशीच्या लोकांना ‘त्रिग्रह ग्रह’ योगाचा फायदा..?

या मंत्रांचा करा जप

१. जप मंत्र – 

ॐ नमः शिवाय

२. महामृत्युंजय मंत्र – 

ॐ त्र्यंबकम यजमाहे सुगंधी पुष्टीवर्धनम्। उर्वरुकमिव बंधनानां मृत्युोर्मक्षिय ममृतात् ॥

३. रुद्र जप मंत्र – 

ॐ नमो भगवते रुद्राय

४. रुद्र गायत्री मंत्र – (Masik Shivratri)

ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here