Nashik Crime | नाशकात पोलीस अधीक्षकाचा मुलावर प्राणघातक हल्ला; दिली जीवे मारण्याची धमकी

0
30
#image_title

Nashik Crime | नाशकात कौटुंबिक वादातून अपर पोलीस अधीक्षकाने आपल्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना पाथर्डी फाटा येथे शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी आता इंदिरानगर पोलीस ठाण्यात अनिल शिवाजी पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित अनिल पवार हे अमरावती येथे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अपर अधीक्षक पदावर कार्यरत असून नाशिक मध्ये पाथर्डी फाटा परिसरात निवासासाठी आहेत. तक्रार दाखल होताच अनिल फरार झाल्याची माहिती आहे.

Nashik Crime | गॅंगस्टर अबू सालेमला भेटायला आलेल्या दोघा जणांची एटीएसकडून कसून चौकशी

बापाकडून मुलाला जीवे मारण्याची धमकी

मुलगा अभिषेकच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी दि. 11 ऑक्टोबर रोजी साडेनऊच्या सुमारास अनिल घरात आरडाओरड करीत होते. त्यामुळे त्यांचा मुलगा अभिषेक याने पोलिसांकडे मदत मागितली. इंदिरानगर पोलीसांनी पवार यांच्या घरी जाऊन वाद मिटवला. परंतु पोलिसांचे पथक माघारी फिरताच संतप्त अनिल यांनी अभिषेकला मारहाण केली, त्याचे डोके भिंतीवर आपटून ठार मारण्यासह, कारागृह डांबण्याची धमकी दिली. जखमी अभिषेक वर सध्या उपचार सुरू असून, अनिल पवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पवार फरार आहेत. दरम्यान, दि. 29 ते 30 ऑगस्ट दरम्यान, अनिल पवार यांच्या घरात घरफोडी झाली होती. ज्यात 4 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरीला देखील गेला होता.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here