Deola | देवळा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

0
50
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | समरसता, समर्पण, सिद्धता यातून समाज व राष्ट्र उभारणीसाठी स्वयंसेवकांनी सतत सिद्ध असायला हवे. संपूर्ण समाजाचे संगठन आणि आदर्श समाजनिर्मिती करणे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यरत आहे, असे प्रतिपादन संघाचे जिल्हा कार्यवाह गंगाधर पगार यांनी रविवार (दि.१३) रोजी केले. संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देवळा शहरातून पथसंचलन व महाविद्यालय आवारात शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात वक्ता म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते.

Deola | सरस्वतीवाडी येथून चोरीस गेलेला ट्रॅक्टर दिंडोरीत सापडला

पथसांचलन पाहण्यासाठी नागरिकांनी उत्सुकता दर्शवली

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले निवृत्त प्राध्यापक भास्कर कुवर यांनीही मनोगत व्यक्त करत संघाच्या कार्यपद्धतीबद्दल गौरवोद्गार काढले. तालुका कार्यवाह पुंडलिक आहेर, शारीरिक प्रमुख लक्ष्मीकांत पाटील, काशिनाथ सोनवणे, श्यामराव सूर्यवंशी, जिल्हा प्रबोधन मंचाचे प्रमुख बापू शिंदे आदी उपस्थित होते. भगवा ध्वज, दंड, घोषपथक यांच्यासह स्वयंसेवक पथसंचलनात सहभागी झाले. संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी उत्सुकता दर्शवली तर ठिकठिकाणी या पथसंचलनावर पुष्पवृष्टी करण्यात आली. समारोपानंतर शस्त्रपूजन करण्यात येऊन सुभाषित, अमृतवचन सादर करण्यात आले. तालुका प्रचारप्रमुख मोठाभाऊ पगार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी तालुक्यातील स्वयंसेवक उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here