Nashik Crime | आडगाव गुन्हे शोध पथकास बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या सराईतास जेरबंद करण्यामध्ये यश आले असून याप्रकरणी आता आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास चालू आहे.
Nashik Crime | व्हर्चुअल अटकेची भीती दाखवत महिलेकडून उकळले साडेतीन लाख रुपये
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सध्या नाशिक शहरात वाढलेल्या गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्यासाठी सराईत गुन्हेगारांचा शोध घेत तसेच शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलीस अंमलदार निखिल वाघचौरे यांना गुप्तहेरामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, आडगाव पोलीस ठाणे रेकॉर्डवरील संशयित सुरज कांतीलाल वर्मा हा देशी बनावटीचा कट्टा घेऊन जनार्दन स्वामींच्या मठा मागील गेट जवळच्या झाडाखाली असलेल्या मारुती मूर्ती जवळून तपोवन नाशिक येथे येणार असल्याची टीप लागली होती.
सापळा रचत पोलिसांनी केली कारवाई
यावेळी पोलिसांनी सापळा रचून रेकॉर्डवरील सुरज कांतीलाल वर्मा याला ताब्यात घेतले असून त्याची अंगझडती घेतली असता 30 हजार रुपये किमतीचे 1 लोखंडी धातूचे देशी बनावटीचे पिस्टल 1 मॅक्झिन व त्यात पिवळ्या धातूचा एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार देवराम सुरंजे या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.
Nashik Crime | नाशिकमध्ये हद्दपार गुंडाची दहशत; कोयत्याच्या धाकावर दुकानदाराकडे खंडणीची मागणी
शोध पथकाने बजावली कामगिरी
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक परिमंडळ एकचे पोलीस उपयुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्ता पद्मजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, देवराम सुरंजे, हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ, दादासाहेब वाघ, निलेश काटकर, पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे, निखिल वाघचौरे, सचिन बहिकर अमोल देशमुख, महिला पोलिस हवालदार वैशाली बच्छाव, महिला पोलीस अंमलदार वैशाली महाले यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम