सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | कसमादेचे वैभव असलेल्या वसाकाची चाके थांबली, अनेक सहकारी साखर बंद पडले १०,१२ वर्षांपूर्वी या कार्यक्षेत्रात प्रचंड प्रमाणात उसाचे क्षेत्र होते. मात्र कारखाने बंद झाले त्यामुळे क्षेत्र ही घटले आहे. या सर्व परिस्थितीवर मात करून खालप ता. देवळा येथील तरुण युवा उद्योजक कैलास देवरे यांनी वडील आंनदा देवरे (बडोदकर) यांच्या आशिर्वादाने २००६ साली सुरू केलेल्या छोट्या गुळ निर्मिती उद्योगाने आज कसमादेमध्ये नावलौकीक मिळवून उस उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगला भाव देऊन आदर्श निर्माण केला आहे. असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केले. खालप ता. देवळा येथे छत्रपती गूळ निर्मिती उद्योगाच्या वतीने गुरुवारी दि. ३ रोजी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर बॉयलर अग्नी प्रतिपदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
Deola | पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा देवळा बाजार समितीच्या वतीने निषेध
गूळनिर्मिती कारखान्याच्या उसाचे पूजन
देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखारी येथील देवदरा देवस्थानचे प्रमुख महंत श्री. श्री. गणेशपुरी महाराजांच्या पावन हस्ते व सुराणा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रमणलाल सुराणा, म.वि.प्र.चे माजी संचालक डॉ. व्ही. एम. निकम आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपुर्ण गुळ निर्मिती कारखान्याच्या छोटे बॉयलर तसेच मिशनरी, उसाचे पुजन करण्यात आले. नैसर्गिक वनौषधी वापरून सेंद्रिय गुळ, काकवी व उपपदार्थ तयार करून महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या सीमा ओलांडून खालप येथील छत्रपती गुळ उद्योग समूहाने नावलौकिक मिळविला आहे. यावेळी वसाकाचे माजी संचालक आनंदा देवरे, शेतकरी संघाचे माजी चेअरमन चिंतामण आहेर, बळवंत सूर्यवंशी, रवींद्र सूर्यवंशी, उमेश सूर्यवंशी, मुरलीधर अहिरे, शशिकांत सूर्यवंशी, उखा शेवाळे, भिका शेवाळे, विनोद देवरे, कैलास कोकरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
Deola | अवैधरित्या गोमांसाची वाहतूक करणारे वाहन गोरक्षक संघटनेच्या हाती; आरोपी फरार
उसाला प्रतिटन ३ हजार रुपये भाव
खालप येथील सेंद्रिय गूळ उद्योग निर्मिती समूहाने ऊस उत्पादक शेतकरी यांचा विश्वास संपादन करून आपल्या व्यवसायात सातत्य ठेवले आहे. सेंद्रिय पद्धतीने तयार करण्यात येत असलेल्या येथील गुळाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावर्षीच्या हंगामात उसाला प्रतिटन ३ हजार रुपये भाव आपण जाहीर करीत असल्याचे यावेळी संचालक कैलास देवरे यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम