Nashik Crime | येवला तालुका पोलिसांची मोठी कामगिरी; चैन चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश

0
55
#image_title

Nashik Crime | येवला तालुका पोलिसांकडून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे. तेव्हा चैन चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून येवला, लासलगाव, नांदगाव, वैजापूर परिसरात  अंतरजिल्ह्यातील सराईत आरोपींकडून आठ लाख 35 रुपये किमतीचे 105 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संजय रमेश बाबरे (रा. लोणी ता.राहता) व राहुल रमेश मावस (रा. नादी ता. वैजापूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती येवला तालुका पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Nashik Crime | नाशिकमध्ये चक्क चंदनाचे झाड चोरून नेण्याचा प्रयत्न

शोध पथकाच्या कामगिरीला यश

येवला तालुका पोलीस स्थानकात सोनाली शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तपास सुरू असताना हे आरोपी पोलिसांच्या हाती लागले. नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या आदेशानुसार, येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली, येवला तालुका पोलीस स्टेशनचे पो. उप निरी. हर्षवर्धन बहीर, पो. ना. सचिन वैरागर, पंकज शिंदे, नितीन पानसरे, सागर बनकर यांचे पथक तपास करीत होते. या चोरीचा तपास करताना चोरीतील आरोपी संजय रमेश बावरे आणि राहुल रमेश मावस यांनी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती तपास पथकाला लागली त्यानंतर या चोरट्यांना ताब्यात घेऊन अधिक विचारणा केली असता त्यांनी येवला तालुका, लासलगाव, नांदगाव व वैजापूर पोलीस स्टेशन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्याकडून 5 चैन स्नॅचिंगचे गुन्हे व 1 मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात येवला पोलिसांना यश आले.

Nashik Crime | नाशकात दिवसाढवळ्या टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने हल्ला

दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चार तोळे वजनाची 2 लाख 80 हजार रुपयांची पोत, एक तोळे वजनाची 70 हजार रुपयांची पोत, एक तोळे वजनाची 70 हजार रुपयांची पोत, तीन तोळे वजनाचा 2 लाख 10 हजार रुपयांचा पोहे हार, दीड तोळा वजनाची 1 लाख 5 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी व 1 लाख किमतीची काळ्या रंगाची बजाज पल्सर असा एकूण 8 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here