Nashik Crime | नाशिकमध्ये चक्क चंदन चोरट्याने चंदनाचे झाड तोडून नेल्याची घटना घडली आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाबाहेरील चंदनाचे झाड तोडून नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आता नाशिक रोड पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने शासकीय कार्यालयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
Nashik Crime | नाशिकमध्ये तोतया डॉक्टरने महिला वकिलाला लुबाडले
पोलिसांच्या कार्यवाहीनंतरही चोऱ्यांचे सत्र सुरू
चंदन चोरटे आता शासकीय कार्यालये, निवासस्थानांच्या आवारातून चंदन चोरी करत असल्याचे समोर आल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक निवासस्थानांसह औद्योगिक वसाहतींमधून देखील चंदन वृक्ष तोडून चोरी केले जात आहेत. चोरी करताना चोरट्यांकडून सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याचे उघड झाले असून या घटनांमुळे चंदन चोरट्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चंदन चोरट्यांना पकडून देखील चंदन चोरीचे सत्र सुरूच आहे.
Nashik Crime | नाशिक जिल्हा रुग्णालयात चक्क जिवंत बाळाला मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
बुधवार मध्यरात्री घडली घटना
कारागृहरक्षक आशा फड त्यांनी केलेल्या फिर्यादीनुसार, बुधवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळील मोकळ्या जागेत असलेल्या चंदनाच्या झाडाला तोडून येण्याचा प्रयत्न केला गेला. ही बाब लक्षात येताच सुरक्षारक्षकांनी चोरट्याला हटकवले त्यामुळे चोरटा येथून पसार झाला. या प्रकरणी आता नाशिक रोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम