Nashik Crime | नाशिकमध्ये गुंडांनी मिरवणूक काढलेल्या ‘बॉस’ची नाशिक पोलिसांनी काढली धिंड

0
86
Nashik Crime
Nashik Crime

नाशिक :  नुकताच सोशल मिडियावर नाशिकमधील एका सराईत गुन्हेगाराच्या मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर नाशिक पोलिसांनी या गुंडावर कारवाई करत धिंड काढली आहे. या प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार या गुंडावर 2023 मध्ये तत्कालीन पोलिस आयुक्त यांच्या आदेशाने स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून, वारंवार शहरात होत असलेल्या गुन्हेगारी कृत्यात सहभागी असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी संशयित हर्षद पाटणकर याला स्थानबद्ध केले होते. या गुन्हेगारास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashikroad Central Jail) स्थानबद्ध  करण्यात आले होते.

दरम्यान, कारवाईची मुदत संपल्यानंतर कारागृहातून बाहेर पडलेल्या गुन्हेगाराची शहरातील शरणपुर परिसरात मिरवणूक काढण्यात आली होती. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी यावर कारवाई करत या संबंधित गुन्हेगारासह त्याच्या गाडी चालकाला अटक केली असून, या मिरवणुकीत वापरलेल्या एक्सयूव्ही गाडीवरही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

Nashik Crime | नाशिकमधील मोबाईल दुकानांवर पोलिसांचे धाड सत्र; पाच दुकानदार ताब्यात

यापूर्वीही नाशिकमध्ये अशी एक घटना समोर आली होती. दरम्यान, यामुळे परिसरात दहशत व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. यामुळे या प्रकाराची गंभीर दखल देत नाशिक पोलिसांनी (Nashik Police) तातडीने कारवाई करत सराईत गुन्हेगारासह आणखी एकाला अटक करत यांची थेट परिसरातून धिंड काढली. हर्षद सुनील पाटणकर (वय 25, रा.शरणपूर रोड) आणि पवन माणिक कसबे (वय 31, रा.ध्रुवनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. (Nashik Crime)

Nashik Crime |  नेमकं प्रकरण काय..?

हर्षद पाटणकर हा वारंवार गुन्ह्यांमध्ये आढळून येत असल्याने त्याला सुरुवातीला तडीपार करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही तो पुन्हा काही गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्यानेचे आढळल्यानंतर जुलै 2023 मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या आदेशाने त्यास एमपीडीए कायद्यांतर्गत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. याची मंगळवारी (दि.२३) स्थानबद्धतेची मुदत पूर्ण झाल्याने बुधवारी (दि.24) याला कारागृहातून सुटका झाली होती. (Nashik Crime)

Nashik Crime News | नाशिकमधील नामांकित महाविद्यालयाची शिपायाकडून फसवणूक; लाखोंची हेराफेरी

दरम्यान, यानंतर हर्षद याला कारमध्ये बसवून शहरातील गुंडांनी त्याची शरणपुर भागात थाटात मिरवणूक काढली. बुधवारी सायंकाळच्या सुमारास निघालेली ही गुंडांची मिरवणूक परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त कार्यालयासमोरून जात असताना यावेळी कर्णकर्कश हॉर्न वाजवत शेकडो दुचाकी या मिरवणुकीत होत्या. यावर पोलिसांनी तातडीने दखल घेत, संशयितांचा पाठलाग केला. पोलीस आपल्या मागावर असल्याचे कळाल्यानंतर मुख्य संशयित फरार झाले.

यानंतर सरकारवाडा पोलिसांनी व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या संशयित हर्षद पाटणकर, कसबे यांच्यासह गोपाल नागोरकर, शॉन मायकल, जॉय मायकल, रॉबिन्सन बत्तिसे, वैभव खंडारे, विकास नेपाळी, वेदांत चाळगे यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर या दोघं मुख्य संशयितांना ध्रुवनगर भागातून ताब्यात घेण्यात आले असून, इतर संशयितांचाही पोलिस शोध घेत आहेत.(Nashik Crime)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here