Nashik Citilink Accident | नाशिक महानगर पालिकेच्या सिटीलिंक बससेवा आता पुन्हा वादात सापडली असून, नशिक शहरातील नाशिकरोड परिसरात सिटीलिंक बसच्या धडकेत एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीही सिटीलिंक बस अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. या अपघातात पाच वर्षीय चिमुकलीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, हा ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार असल्याची माहिती समोर आली आहे. (Nashik Citilink Accident)
Nashik Citilink Accident | नेमकं काय घडलं..?
अधिक माहितीनुसार, आज बुधवार (दि. 10) जुलै रोजी दुपारी दीड वाजता नशिकरोड भागातील गाडेकर मळा परिसरात बस डेपो आवारात हा अपघात घडला. या अपघातात सानवी सागर गवई (वय – 5 वर्ष, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, नाशिकरोड) या चिमुरडीचा मृत्यु झाला आहे. मृत चिमुकली ही इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत असून, शाळेतून ती तिच्या आजोबांसोबत आजी जिजाबाई गवई यांच्या बस डेपो आवरातील चहाच्या टपरीवर जात असताना सिटीलींक बस चालकाने भरधाव वेगाने तिला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात डोक्यावरून बसचे चाक गेल्याने चिमूरडीचा जागीच मृत्यू झाला असून, तिचे आजोबादेखील जखमी आहेत. (Nashik Citilink Accident)
Nashik News | नाशिक हादरलं..! जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच वृद्धाला जिवंत जाळले
बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय
या अपघातातील बस चालक हा दारु पिऊन बस चालवत असल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात येत आहे. संतप्त जमावाकडून बसची तोडफोड करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, नाशिकरोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेची पुढील तपास नाशिकरोड पोलिस करत आहे. या घटनेमुळे शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Nashik News | नाशिकमध्ये प्रेम प्रकरणातून महिलेने पोलिस स्टेशनसमोरच कापली हाताची नस
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम