Nashik Accident : गेल्या काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या चांदवड तालुक्यात राहुड घाटात एसटी आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात अनेक प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान, नाशिकमधील ही घटना ताजी असतानाच आता नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्याजवळ (Pimpalgaon Baswant Toll Plaza) आणखी एक एसटी दुर्घटना घडली आहे.
पिंपळगाव टोलनाका येथे एसटी बस आणि टँकरचा अपघात झाला असून, या अपघातात जवळपास २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. तर, या जखमी प्रवासींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रविवार (दि. २६ मे) रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.(Nashik Accident)
Nashik Accident | राहुड घाटातील अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू; दोन प्रवासी देवळा तालुक्यातील
Nashik Accident | नेमकं काय घडलं..?
यानुसार, पिंपळगाव टोल नाक्यावर या एस टी महामंडळाच्या बसने समोरील टँकरला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला आणि यात २० हून अधिक प्रवासी जखमी झाले. या जखमींवर पिंपळगाव बसवंत येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. (Nashik Accident)
बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात
पिंपळगाव टोल नाक्यावर जळगाव आगाराची बस ही मुंबईच्या दिशेने जात असताना सायंकाळी ५ वाजता बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला अशी चर्चा आहे. तर, सीसीटीव्ही फुटेजनुसार, पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर भरधाव वेगाने आलेल्या बसवरचे चालकाचे नियंत्रण सुटले आणि या बसने टँकरला मागून येत जोरदार धडक दिली. या अपघातात काही प्रवाशांना जबर मार लागला आहे.(Nashik Accident)
Nashik Accident | राहुड घाटात एसटी बस-ट्रकचा अपघात; आठ प्रवाशांच्या मृत्यूची शक्यता
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम