Nashik Accident | राहुड घाटात एसटी बस-ट्रकचा अपघात; आठ प्रवाशांच्या मृत्यूची शक्यता

0
305
Nashik Accident
Nashik Accident

Nashik Accident | नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यानुसार, नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे एक भीषण अपघात घडला आहे. चांदवड (Chandwad) जवळील राहुड घाटात महामंडळ एसटी बस आणि ट्रक यात जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. यात सात प्रवाशांचा मृत्यू झाला असून, इतर गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड जवळील राहूड घाटात हा अपघात झाला असून, या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. आपघातातील जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. मात्र, यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. (Nashik Accident)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here