Malegaon | मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार; कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर

0
52
Malegaon
Malegaon

 Malegaon |  नाशिकच्या मालेगावमधून (Malegaon) एक मोठी बातमी समोर आली असून, यानुसार  मालेगावच्या माजी महापौरांवर गोळीबार झाला असून, यात ते गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, यात मालेगावचे माजी महापौर आणि AMIM चे मालेगाव महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा ही गंभीर जखमी झाले आहेत.

रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल मलिक यांच्यावर तब्बल तीन गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

मालेगावमध्ये हा गुंडाराज सुरू – आ. मौलाना मुफ्ती

दरम्यान, या घटनेवेळी अब्दुल मलिक हे एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. MIM आमदार मौलाना मुफ्ती यांनीही घटनेची चौकशी करत हल्लेखोरांना लवकरात लवकर शोधून अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच मालेगावमध्ये हा गुंडाराज सुरू असल्याचेही आरोप आमदार मौलाना मुफ्ती यांच्याकडून करण्यात आले आहे. या हल्लानंतर मालेगावात (Malegaon) प्रचंड तणावाचं वातावरण असून, थेट माजी महापौरांवरच (Malegaon ex mayor firing) हल्ला झाल्याने मालेगावमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर येणार आहे.

Malegaon | मालेगावात सामूहिक नमाज पठणाच्यावेळी फडकावला पॅलेस्टाइनचा ध्वज

 Malegaon | नेमकं प्रकरण काय..? 

मालेगावात मध्यरात्री १२ ते १ वजेच्या सुमारास मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गवर मालेगावचे माजी महापौर आणि MIM चे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा हे एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसलेले होते. यावेळी मोटार सायकलवरून काही अज्ञात हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर गोळीबार केला असून, त्यांनी जवळपास तीन गोळ्या फेर केल्या आणि त्यांनी तेथून पळ काढला.  (Malegaon)

या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना हाताला, पायाला व छातीजवळ अशा तीन गोळ्या लागल्या आहेत. या हल्ल्यात मलिक गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे मालेगावमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. हा हल्ला काही राजकीय वादातून झाल्याचं बोललं जात असून, मालेगावमध्ये गोळीबार आणि हत्येच्या घटना वाढत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Malegaon | राणेंनी ‘मिनी पाकिस्तान’ म्हटल्यावर नामदार भुसे आक्रमक भूमिका का घेत नाही?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here