Narhari Zhirwal | सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच आरक्षणाच्या मुद्द्यांनी चांगलंच राजकारण रंगताना दिसतयं. एकीकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना नेत्यांची उपोषण आणि आंदोलनाचे सत्र सुरूच आहे. तर दुसरीकडे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी आदिवासी समाजाने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही समाज आमने-सामने आले असून आता धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यास अजित पवार गटाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी देखील विरोध दर्शवत उपोषण करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षामध्ये आंदोलनाच्या मुद्द्यावरून वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
Narhari Zirwal | ‘अजितदादा म्हणजे फणस’ कौतुकसुमने उधळत झिरवाळांनी दादांसमोर मुलाची बाजू झाकली..?
नरहरी झिरवळांचा बेमुदत आंदोलनाचा इशारा
अजित पवार गटाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला स्पष्टपणे विरोध दर्शवला असून सोमवारपासून मंत्रालयासमोर असलेल्या गांधी पुतळ्याजवळ बसून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याचसोबत सरकारने धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देण्याचा जीआर काढण्याची भूमिका मागे घ्यावी. अशी मागणी देखील केली आहे. या मागणीकरिता नरहरी झिरवळ यांच्यासह आदिवासी आमदार गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
“आमचा धनगर आरक्षणाला विरोध नाही पण…”
तर, काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आदिवासी समाजाच्या आमदारांच्या झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी आदिवासी समाजाच्या आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारने जर धनगर समाजाच्या आरक्षणाचा जीआर काढला, तर मी आमदारकीचा राजीनामा देईन असे म्हटले होते. “राज्य सरकारच्या या चुकीच्या निर्णयामुळे आमची मुले रस्त्यावर येतील. आमचा धनगर आरक्षणाला विरोध नाही. परंतु आमच्यामध्ये त्यांना जर आणणार असाल तर आम्ही याला विरोध करणार आहोत.” असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे आता राज्य सरकार धनगर आरक्षणाबाबत नेमका काय निर्णय घेईल याकडे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम