Narhari Zirwal | ‘अजितदादा म्हणजे फणस’ कौतुकसुमने उधळत झिरवाळांनी दादांसमोर मुलाची बाजू झाकली..?

0
50
Narhari Zirwal
Narhari Zirwal

नाशिक :  गेल्या काही दिवसांपासून विधानगेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) आणि त्यांचे चिरंजीव हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याचे कारण म्हणजे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नाशिकमधील निष्ठवंतांच्या मेळाव्यासाठी गोकुळ झिरवाळ यांची उपस्थिती आणि “माझी छाती फाडली तरी शरद पवार दिसतील. पक्षाकडून संधी मिळाल्यास वडिलांविरोधातही निवडणूक लढणार”, हे वक्तव्य.

त्यामुळे नरहरी झिरवाळ शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यानंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी दिंडोरी विधानसभा मतदार संघातून नरहरी झिरवाळ यांची उमेदवारी जाहीर केली. यानंतर नरहरी झिरवाळ यांनी आपल्या मुलाच्या भूमिकेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत “मी त्याचा बाप आहे, तो माझा नाही. तो माझा मुलगा आहे. माझ्या शब्दाबाहेर नाही” असे म्हटले होते.

दरम्यान, आज अजित पवार (Ajit Pawar) हे नाशिक दौऱ्यावर असताना आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांच्या कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात (Kalwan-Surgana Vidhan Sabha Constituency) तब्बल 736 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी झिरवाळ हेदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुन्हा गोकुळ झिरवाळ यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

Nashik Shivsena | नाशिकमध्ये ठाकरे गटाचे दोन उमेदवार जाहीर; मविआत वादाची ठिणगी..?

Narhari Zirwal | माझा मुलगा माझा आहे; त्याला आमदार व्हायचे असेल तर… 

“दादा म्हणजे फणस आहे. वरून काटे आणि आतमध्ये गरे. कोणी काहीही बोललं तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला काही कमी पडले तर सध्या मी आहे आणि माझा मुलगा हा माझा आहे. त्याच्याविषयी सध्या अनेक बातम्या सुरू आहे. त्याला जर आमदार व्हायचे असेल तर मी दादांना सांगेल की त्याला आमदार करा. पण तो आता दादांनीच दिलेल्या फ्लॅटवर मुंबईत काम करत” असल्याचे नरहरी झिरवाळ म्हणाले.

धरण कधी होतील माहित नाही निदान बंधारे तरी द्या

“आम्हाला या भागात शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत. या भागात धरण कधी होतील माहिती नाही पण आम्हाला निदान छोटे बंधारे तरी द्या. फॉरेस्ट प्लॉट देण्याची देखील आमची मागणी आहे. वन पट्टे हे केवळ दोन गुंठे दिले आहेत. आम्ही 1500 रुपये बहिणींना दिले आहेत. आता तुम्ही दाजीला सांभाळा. कुटुंबासाठी, शिक्षणासाठी त्या पैशांचा योग्य वापर करा”, असेही झिरवाळ म्हणाले.

Nashik News | नाशिकमध्ये दादा गटाला मोठा धक्का; आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here