नाशिक : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जनसन्मान यात्रेचा आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदार संघातून शुभारंभ झाला. पुढील चार दिवस आता अजित पवार ही नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ पिंजून काढणार आहे. दरम्यान, आज अजित पवारांच्या जनसन्मान मेळाव्यात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या भाषणाची, कार्यक्रम स्थळावरील चिखलाची आणि झिरवाळ यांच्या चिरंजीवाचीच चर्चा होती.
जयंत पाटलांच्या निष्ठवंतांच्या सभेत उपस्थित राहणाऱ्या गोकुळ झिरवाळांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेकडे पाठ फिरवली आणि पुन्हा एकदा वडीलांविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविली. तर इकडे नरहरी झिरवाळांनी आपल्याला पक्ष खासदार होण्याचा आग्रह करत होता, असा गौप्यस्फोट केला आहे.
मलाही पक्ष म्हणत होता की तुम्ही खासदार व्हा, पण…
यावेळी नरहरी झिरवाळ म्हणाले की, “आम्हा सर्वांना अजित पवारांना (Ajit Pawar) वेगळ्या खुर्चीवर बसल्याचं पाहायचंय आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला मदत करायची आहे. मलाही पक्ष म्हणत होता की तुम्ही खासदार व्हा. पण आता मला फक्त मराठीच येते. त्यामुळं मग मी कशाला खासदार होऊ’, अशी मिश्किल फटकेबाजी विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी दिंडोरीतील जनसन्मा यात्रेच्या (Jansanman Yatra)मेळाव्यातून बोलताना केली आहे.
Jansanman Yatra | इथे माझं कोण ऐकतं.?
भाषणाच्या सुरुवातीलाच झिरवाळ म्हणाले की, “मी सर्व लाडक्या बहिणी आणि लाडके दाजी यांचं याठिकाणी स्वागत करतो. मी विधानसभेचा अध्यक्ष असलो. तरी आता इथे माझं कोण ऐकतं.? त्यामुळे मी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विनंती करतो की त्यांनी मला कृपया जास्त बोलण्याची संधी द्यावी. मी विधानसभेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदी केवळ अजित पवार यांच्यामुळे बसलो”, असेही झिरवाळ यावेळी म्हणाले.
13 जिल्ह्यांमध्ये आदिवासी दिनानिमित्त सुट्टी
“मी पहिलं भाषण केलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच कोरोना आला. त्यामुळे दररोज खुर्चीवर औषध फवारावं लागयाचं आणि निम्मा विकास निधी तर तिथेच खर्च झाला. तसेच यावेळी नरहरी झिरवाळ यांनी राज्यांतील 13 आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी दिनानिमित्त सुट्टी देण्यात येणार असल्याचीही घोषणा केली आहे.
आम्हा सर्वांना अजित पवार यांना वेगळ्या खुर्चीवर बसल्याचं पाहायचं आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करायची आहे. मला पक्ष म्हणत होता तुम्ही खासदार व्हा. आता मला मराठीच येते तर मग मी कशाला खासदार होऊ, अशी तुफान फटकेबाजी नरहरी झिरवाळ यांनी केली आहे.
Ajit Pawar In Nashik | नाशकात दादांचा मोठा डाव; शरद पवारांचा निष्ठावंत अजित पवारांच्या गळाला..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम