Skip to content

नालासोपारा येथील व्यक्तीची नायजेरियन आरोपीनी अपहरण करून केली हत्या


नालासोपारा पूर्वेस प्रगती नगर वस्तीत एका नागरिकाला चार ते पाच नायजेरियन नागरिकांनी घरात घुसून मारहाणीसह अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तेवढंच नाही तर नायजेरियन नागरिकांनी अपहरण करून त्याची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे.

नालासोपारा परिसरात राहणाऱ्या मायकल कीचेबाबा वय 50 असं मयत नायजेरियन व्यक्तीचं नाव आहे. 3 मे रोजी नियजेरियन आरोपींनी त्याच्या राहत्या घरी घुसून मारहाण केली होती. त्याला मारत मारत एका गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले आहे. हा सर्व प्रकार रस्त्याकडेला लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. सीसी टीव्हीमध्ये दिसत असलेल्या आरोपींनीच त्याची हत्या केली असल्याची माहिती समोर आली.

अमंली पदार्थांच्या आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुरुवारी मायकेलचा मृतदेह नायगाव परेरा नगर इथल्या एका रूमच्या टॉयलेट मध्ये पोलिसांना आढळून आला. वालीव पोलिसांनी याप्रकरणी पाच ते सहा जणांविरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!