Skip to content

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमध्ये घुसली चारचाकी टवेरा, चालकासह पाच जणांचा जागीच मृत्यू


नागपूर येथील उमरेड मार्गावर भीषण अपघात घडला आहे. या अपघातात उमरेड वरून प्रवाशांना घेऊन येणाऱ्या चारचाकीने भरधाव वेगाने ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात चार चाकी मध्ये असणारे सहा जण जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे.

उमरेड मार्गावरील मौजा उमरगाव राम कुलर कंपनीजवळ शुक्रवारी रात्री 10.30 वाजताही दुर्घटना घडली. या भीषण अपघातात मृतांमध्ये 5 पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. सागर शेंडे रा. पिवळी नदीजवळ, उप्पलवाडी (टवेराचालक), मेघा आशिष भुजाडे रा. नझूल ले-आउट बेझनबाग, देविदास गेडाम, नरेश डोंगरे रा. भीमचौक, इंदोरा अशी मृतांची नावे आहे तर इतर तीन अशी ओळख पटलेली नाही.

नागपूर वरील महामार्गावर रात्रीची वेळ असल्याने चालकाने टवेराचा वेग फारच वाढविला होता. एमएच 40- बीजी 7757 क्रमांकाचा टिप्पर रस्त्याच्या कडेला उभा असलेला चारचाकी चालकाल नजरेस पडला नाही. लक्षात येताच चालकाने करकचून ब्रेक लावला. चार चाकी चा वेग जास्त असल्याने अनियंत्रित होऊन टिप्परवर धडकली. तवेरा चार चाकी ट्रक मध्ये घुसल्याने गाडीचा चक्काचूर झाला. प्रवाशांचा आत रक्ताचा थारोळ झालेला दिसला चालकासह पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय.

 

प्रवाशांच्या किंचाळण्याचा आवाज आणि गाडीचा ब्रेक लागण्याचा आवाज ऐकताच इतर गाड्या देखील अपघातस्थळी थांबल्या. घटनेची माहिती मिळताच हुडके‌श्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पाचगाव पोलिस चौकीतील कर्मचारीही मदतीसाठी धावले. जखमींना मिळेल त्या वाहनाने तातडीने उपचारासाठी नागपूरकडे रवाना करण्यात आले. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.घटनेनंतर उमरेड मार्गावर वाहतूक खोळंबली होती. उमरेड पोलिसांनी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!