Mumbai Rain | मुंबई तुंबली..! सर्वसामान्यांसह नेत्यांनाही फटका; अनेक आमदार ट्रेनमध्ये अडकले

0
63
Mumbai Rain
Mumbai Rain

मुंबई:   दर पावसाळ्याप्रमाणे याहीवेळी पहिल्या मुसळधार पवसातच देशाची आर्थिक राजधानी मुंबई तुंबली आहे. तर, विशेष म्हणजे याचा फटका चाकरमान्यांसह आमदारांनाही बसल्याचे पहायला मिळाले असून, मंत्री आणि आमदारांवर चक्क ट्रॅकवरुन चालण्याची वेळ आली. सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, यासाठी राज्यातील आमदार हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासूनच मुंबईची रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोकल ट्रेनचे (Mumbai Local Train) व्यवस्थापन कोलमडले आहे. दरम्यान, सायन स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्याने एक्स्प्रेस ट्रेन अडकून पडल्या. अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यासाठी आज आमदार महालक्ष्मी एक्स्प्रेसने मुंबईला निघाले होते. मात्र, ही एक्सप्रेस अडकून पडल्याने यात अनेक आमदार अडकल्याची माहिती आहे. दरम्यान, एक्सप्रेस अडकल्याने मंत्री अनिल पाटील (Anil Patil) व आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी रेल्वे ट्रॅकवरुन पायी चालताना दिसून आले. याचा एक व्हीडिओ सोशल मिडियावर पहायला मिळाले.

Pavsali Adhiveshan | खळबळजनक भेटींचा सिलसिला; ठाकरे-फडणवीसांचा एकत्र प्रवास ते चंद्रकांत पाटील-ठाकरे भेट

Mumbai Rain |  अनेक आमदार व मंत्री ट्रेनमध्ये अडकले 

या व्हीडिओमध्ये अमोल मिटकरी हे परिस्थितीबद्दल माहिती देत आहेत. आम्ही असलेल्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये आणखी आठ ते दहा आमदारही अडकलेले आहेत. पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे आज हा आम्ही वेगळा अनुभव घेतोय. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा असून, रेल्वे वाहतूक लवकरात लवकर सुरळीत होईल, अशी अपेक्षा असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.(Mumbai Rain)

काहीवेळ रेल्वे ट्रॅकवरुन पायी चालत आमदार अमोल मिटकरी व मंत्री अनिल पाटील ही कुर्ला ईस्ट नेहरूनगर पोलीस चौकीत येऊन बसलेले आहेत. मात्र, पावसामुळे रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने त्यांना लगेच मुंबईला निघणे शक्य नाही. त्यामुळे आता अमोल मिटकरी व मंत्री अनिल पाटील यांच्यासह इतर आमदारही अधिवेशनाला कसे पोहचणार..? हे पहावे लागणार आहे.

Mumbai | रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांची रद्द 

अतिवृष्टीमुळे मुंबईतील रस्ते, ट्रेन इत्यादि व्यवस्था कोलमडल्याने आमदार व मंत्री यांनादेखील अधिवेशनासाठी पोहोचणे अवघड आहे. यामुळे आता अतिवृष्टीचा परिणाम हा विधिमंडळाच्या कामकाजावरही होऊ शकतो. तर, आमदार व मंत्री वेळेत पोहचले नाही. तर, कामकाज काही काळ स्थगित केले जाऊ शकते. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या दालनात नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांच्या डागडुजीसाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र, पावसामुळे अनेक नेते पोहोचू शकले नाही. यामुळे ही बैठक आता रद्द करण्यात आल्याचीही माहिती आहे. (Mumbai Rain)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here