Pavsali Adhiveshan | खळबळजनक भेटींचा सिलसिला; ठाकरे-फडणवीसांचा एकत्र प्रवास ते चंद्रकांत पाटील-ठाकरे भेट

0
85
Pavsali Adhiveshan
Pavsali Adhiveshan

Pavsali Adhiveshan | आज राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस असून, या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्य घटना पाहायला मिळाल्या. आधी मोठी कॅडबरी घेऊन मंत्री चंद्रकांत पाटील हे अंबादास दानवे यांच्या केबिनमध्ये पोहोचले. तिथे उद्धव ठाकरे यांना पाहून ते अवाक झाले. तर, दुसरीकडे लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे, मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची भेट झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रवीण दरेकर यांना बाहेर काढण्यास सांगितले. यानंतर आता थेट पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे भेट 

चंद्रकांत पाटील हे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या भेटीला मोठी कॅडबरी घेऊन आले. यावेळी दानवे यांनी त्यांच्यासमोर पेढ्याचा बॉक्स ठेवला आणि आमचे ३१ खासदार निवडून आले म्हणून आम्ही पेढे वाटत असल्याचे सांगितले. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी एक पेढा घेतली आणि तो तिथेच उभे असलेले अनिल परब यांना दिला व मी यांचा पेढा अॅडव्हान्समध्ये वाटतो, असे म्हणाले. अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार असून, त्यांच्याविरोधात भाजपचे किरण शेलार उभे आहेत. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचा निकाल १ जुलै ला जाहीर होणार असून, चंद्रकांत पाटील यांनी त्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या उमेदवरला पेढा भरवल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे.

Vidhimandal Adhiveshan: विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; शिवसेनेच्या दोन गटांमध्ये संघर्षाची शक्यता

Pavsali Adhiveshan | लिफ्टमध्ये ठाकरे-फडणवीस भेट 

विधानभवनाच्या लिफ्टजवळ उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे समोरासमोर आले. यावेळी दोघांनीही एकाच लिफ्टने प्रवास केला. तर, लिफ्टमध्ये जण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी प्रवीण दरेकर यांना बाहेर काढण्यास सांगितले. याबाबत प्रवीण दरेकर यांनी खुलासा केला असून, ते म्हणाले की, “आपण राजकारणात राजकीय शत्रू असलो. तरीही कोणी कोणाचा सदासर्वकाळ शत्रू नसतो. मी लिफ्टमध्ये जाता असताना देवेंद्रजी आणि उद्धवजी आले मिलिंद नार्वेकरही त्यांच्यासोबत होते.

लिफ्ट सुरु झाली आणि कोणीतरी बोललं की, ‘आपण दोघं एकत्र आहात पाहून, बरं वाटतं’. त्यावर उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे (प्रवीण दरेकर) बोट दाखवून फडणवीस यांना म्हटले की, ‘याला आधी बाहेर काढा’. त्यावर मी त्यांना म्हणालो की, ‘ मी शिवसेनेतून बाहेर जाऊनही तुमचं अजून समाधान झालंच नाही का. ठीक आहे, माझी बाहेर जायचीही तयारी आहे. मग तुम्ही होता का एकत्र..? जसं बोलता तसं करा’. यानंतर लिफ्टमध्ये एकच हास्यविनोद झाला. उद्धवजी जसं बोलतात तसं नाहीये, त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असतं, यानंतर आम्ही वर गेल्यावर त्यांच्या पोटातील उत्तर आम्हाला मिळालं.

Maratha Reservation | ठरलं तर..! मराठा समाजाला इतके आरक्षण..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here