९२४ पथदिव्यांनी उजळणार मुंबई-आग्रा महामार्ग; राष्ट्रीय प्राधिकरणाकडून ९ कोटींचा निधी मंजूर

0
1

नाशिक – नाशिकचे वैभव म्हणून ओळख असलेला मुंबई-आग्रा महामार्ग लवकरच पथदिव्यांनी उजळणार आहे. कारण राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडून सदर महामार्गांवर ९२४ पथदिवे लावण्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर अंधारामुळे अनेकदा अपघात होत असतो. त्यामुळे महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी प्राधिकरणाने नऊ कोटींचा निधी मंजूर केला असून, ह्या निधीतून नाशिक शहरासह वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल प्लाझा आणि कोकणगाव शिवारातील सर्व्हिसरोडवर ९२४ पथदिवे उभारण्यात येणार आहेत. ज्यामुळे महामार्ग प्रकाशमय होईल आणि होणारे अपघात व लुटीच्या अनेक घटना टाळल्या जातील, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गाच्या एकूण ५२ किलोमीटरच्या रस्त्यांवर हे ९२४ पथदिवे बसवले जातील. ज्यात नाशिक परिसरातील ४० किलोमीटर अंतरावर दोन्ही बाजूच्या सर्व्हिसरोडसह ५४४, वणी जंक्शन ते पिंपळगाव टोलनाका या दरम्यानच्या दहा किलोमीटर अंतरावर ३२२ तर कोकणगाव शिवारातील सुमारे पावणे दोन किलोमीटर अंतरावर ५८ असे लख्ख प्रकाश देणारे एलईडी पथदिपे बसविल्यानंतर याच निधीतून ह्या सर्व पथदिव्यांची देखभाल करण्यात येणार आहे.

पावसाळ्यात महामार्गांवर अपघातांच्या प्रमाणात मोठया प्रमाणात वाढ होत असते. या अपघातामुळे काहींना जीव गमवावा लागला असून अनेकांच्या वाट्याला कायमचे अपंगत्व आलेले आहे. तसेच, अनेकदा रस्त्यांवरील अंधाराचा फायदा घेत लुटारूंकडून रस्त्यावरील लुटीच्या घटना घडल्या आहेत. हे सर्व टाळण्यासाठी यासंदर्भात राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडे प्रयत्न सुरु आहे. त्याला आज यश आले असून लवकरच ह्या कामाला सुरुवात होईल, असेही खासदार गोडसे यावेळी म्हणाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here