Skip to content

जनतेला सेवा देण्यासाठी नरेंद्र मोदी प्रयत्नशील ; गावित यांचे देवळा येथे प्रतिपादन


देवळा ;पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांना सेवा कशी देता येईल यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून , केंद्र शासनाच्या विविध योजना तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवाडा कार्यक्रमात त्यांना शंभर टक्के न्याय मिळून देण्यासाठी आपल्यायाला प्रयत्न करायचे आहेत . असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी आज येथे केले .

देवळा येथे नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजिय सेवा पंधरवाडा कार्यक्रमात सफाई कामगारांना कपडे वाटप करतांना आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित , आमदार डॉ राहुल आहेर ,भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर ,जितेंद्र आहेर ,अतुल पवार आदी ( छाया – सोमनाथ जगताप )

देवळा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . ना डॉ गावित यांच्या प्रमुख उपस्थित रक्तदान शिबीर , कोविड बूस्टर डोस ,सफाई कामगारांना कपडे वाटप , वृद्धांना काठी वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले . यावेळी ते बोलत होते . प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ राहूल आहेर ,भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर उपसस्थित होते .

यावेळी ना डॉ गावित म्हणाले कि , नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून , यात केंद्र शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शंभर टक्के पाहचविण्यासाठी लाभार्थ्यांचे ऑन लाईन अर्ज भरून घेणे ,त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या काळात आपल्यायाला काम करायचे आहे . अनेक लाभार्थी अद्याप योजनांपासून वंचित आहेत . त्यांना शोधून त्यांना सेवा कशी देता येईल . यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी झोकून घ्यावे . ना डॉ गावित यांचे देवळा शहरात आगमन होताच त्यांचे पाचकंदील परिसरात ढोल ताशाच्या व फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले . यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला .

उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर ,तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण , शहर अध्यक्ष अतुल पवार यांच्या हस्ते ना डॉ गावित यांचा सत्कार करण्यात आला . प्रास्ताविक पवन अहिरराव यांनी केले . कार्यक्रमास आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एन डी गावित , नगरसेवक मनोज आहेर , अशोक आहेर ,कैलास पवार , आदींसह रोशन अलिटकर , नानू आहेर , किशोर आहेर , संजय कानडे , बाजार समितीचे उपसभापती शन्कर निकम ,हर्षद भामरे , दिनेश पगार , दिशांत देवरे , दौलत थोरात , हर्षद मोरे , भाऊसाहेब आहेर , विजय आहेर ,माजी सरपंच रघु नवरे , सोपान सोनवणे , उपसरपंच नदीश थोरात ,योगेश वाघमारे ,भारत कोठावदे , तहसीलदार विजय सूर्यवंशी , गटविकास अधिकारी राजेश देशमुख आदींसह नगरसेवक , पदाधिकारी ,कार्यकर्ते , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . आभार तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी मानले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!