मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनेबाबत पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली चिंता

0
2

नाशिक – नाशिक शहराचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

एका पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त नाईकनवरे म्हणाले की, शहरात बेरोजगारी, कुटुंबातील आपापसातील संघर्ष यांसारख्या कारणांमुळे अल्पवयीन मुली घरातून पळून जाण्याची अनेक प्रकरणे सध्या पोलिसांना मिळत आहेत. तसेच ज्या आरोपींविरुद्ध कलम ३६३ (अपहरणाची शिक्षा) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे, त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सध्याच्या घटनांबाबत पोलीस आयुक्त यावेळी म्हणाले, मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना पाहता आम्ही नाशिक शहरातील निर्भया पथकांनाही आयपीसी कलम ३६३ अन्वये दाखल झालेल्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना मदत करण्यास सांगितले आहे. तसेच निर्भया पथकही ह्या प्रकरणांत उत्कृष्ट काम करत आहे. तसेच गेल्यावर्षी शहरात १९९ बेपत्ता आणि अपहरणाचे प्रकरणे दाखल झाली होती, त्यापैकी १५१ प्रकरणांचा तपास लागला होता. अजूनही शहरातील बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी निर्भया पथके अथक प्रयत्न करत असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले.

मे २०२२ मध्ये जयंत नाईकनवरे यांनी पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर काही आठवड्यांच्या आत त्यांनी शहरात कार्यरत असलेल्या चार निर्भया पथकांना बेपत्ता लोकांची, प्रामुख्याने मुली आणि महिलांची प्रकरणे तपासण्याचे निर्देश दिले होते. तसेच निर्भया पथकांनी महिलांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी शहरातील विविध पिकनिक स्पॉट्स, शाळा आणि महाविद्यालये व अन्य खासगी आस्थापनांना भेट देण्यास सांगितले होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here