Skip to content

मॉन्सुनचा फटका शेतीच्या उत्पादनावर; खरीप हंगामाचं काय होणार?


पुणे | भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेला अंदाज यावर्षी बराच फोल ठरला. भारतातील अनेक राज्यात पावसाने सरासरीदेखील गाठलेली नाही. राज्यात यंदा पावसाची कमी राहिली. राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांत या पावसाळ्यात कमी पाऊस झालेला आहे. हवामान विभागाने मॉन्सून संपल्याचे जाहीर केलेले आहे. तसेच महाराष्ट्रातून मॉन्सूनचा परतीचा पाऊस पूर्ण झालेला आहे. राज्यातील धरणांमध्ये यंदा जलसाठा पूर्णही झालेला नाही. या सगळ्याचा परिणाम आता शेतीवर होणार आहे. खरीप आणि रब्बी हंगामात उत्पन्न घटण्याची भीतीही आता व्यक्त केली जात आहे.

Mumbai | टीसीची कॉलर पकडून लोकलमध्ये तरूणीची दादागिरी

खरीप हंगामासंदर्भात अंदाज काय आहे?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यंदा खरीप हंगाम चांगला येईल अशी अपेक्षा केलेली होती. कारण हवामान खात्याने यंदा सरासरी पावसाचा अंदाज वर्तवलेला होता. मात्र जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची कमी राहिली. त्यामुळे राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांत अपेक्षित मोसमी पाऊस झालेला नाही. याचा परिणाम आता शेतमालाच्या उत्पन्नावर होणार असं दिसत आहे. खरीप हंगमात उत्पादन मोठया प्रमाणात घटण्याची भीतीही व्यक्त केलेली आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ८९० मंडलांत खरीप पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतीमालाच्या उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे.

येणाऱ्या काळात नाशिकचा कायापालट होणार- मंत्री भुसे

वर्षभर अन्नधान्याची टंचाई जाणवणार..

खरीप हंगामाच्या परिणामामुळे आगामी वर्षभरात अन्नधान्याची टंचाई भासण्याची भीती आहे. राज्याच्या कृषी विभागाने मोसमी पावसाच्या हंगामात ३६ पैकी २४ जिल्ह्यांत अपेक्षित पाऊस झालेला नसल्याचे म्हटलेले आहे. यामुळे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशिम, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यामधील उत्पादन घटणार आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!