Skip to content

Crime News | सासुबाई जरा सांभाळुन…


Crime News | भारतीय संकृतीत सासू-सुनेच्या नात्याला विशेष महत्व आहे.याचं नात्याला काळिमा फासणारी घटना घडलेली आहे. ठाण्यातील एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. प्रत्येक घरात सासू-सुनेचे अनेक वाद आपण ऐकलेच असतील. काळ बदलेला आहे.. पूर्वीसारखी सासू-सुनेचे नातं राहिलेलं नाही. पंरतु आजही काही घरांमध्ये सासू-सुनेचं भांडणं काही नविन नाहीत. मात्र सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला दुसऱ्या महिलेला अमानुष प्रकारे मारहाण करताना दिसत आहे.(Crime news)

मॉन्सुनचा फटका शेतीच्या उत्पादनावर; खरीप हंगामाचं काय होणार?

क्रूरतेचा गाठला कळस!

या व्हिडीओमध्ये सून-सासूला मारहाण करत आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडीओमध्ये सून तिच्या वृद्ध सासूला निर्दयीपणे मारताना दिसत आहे. सासू हॉलमधील सोफ्यावर बसली असताना सून तिला घरातून निघून जा म्हणून वारंवार म्हणताना दिसत आहे. या दोघांमध्ये शाब्दिक वादावादी सुरु असताना सूनेचा राग अनावर होतो आणि ती सासूला सोफ्यावरुन खाली खेचताना दिसत आहे. त्यापूर्वी ती घराचा मुख्य दरवाजा उघडते आणि तिला या घरातून बाहेर जाण्यास सांगते. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे अमानुष घटना सुरु असताना त्या घरात या सासु-सुनेशिवाय अजून एक महिला किचनमध्ये काम करताना दिसत आहे. ही घटना तरीदेखील ती महिला या प्रकारात काहीही हस्तक्षेप करताना दिसत नाही आहे.  ही सर्व धक्कादायक घटना ठाणे पूर्वमधील सिद्धार्थनगर कोपरीमधील आहे. तर मारहाण करणाऱ्या सुनेचं नाव कोमल ललित दयारामणी असून तिचं वय 53 वर्ष आहे. कोमल या इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंंपनात कापूरबावडीला कामावर आहेत.

Mumbai | टीसीची कॉलर पकडून लोकलमध्ये तरूणीची दादागिरी

या घटनेचा संपुर्ण व्हिडीओ सामाजिक कार्यकर्ते Binu Varghese यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील x वरील अधिकृत अकाऊंटवर शेअर केलेला आहे. त्या वृद्ध महिलेच्या नातेवाईकाने हा व्हिडीओ सामाजिक कार्यकर्त्यांना दिलेला आहे. पोलीस या संदर्भात तक्रार नोंदवून घेत नाहीत म्हणून त्यांनी मदत मागितली आहे. म्हणूनच सामाजिक कार्यकर्ते यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे आणि त्यात ठाणे पोलिसांना टॅग केलेलं आहे. ठाणे पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून त्यांनी या प्रकरणात तक्रार नोंदवून घेतलेली आहे. म्हणून मुलगा घरात नसताना सूनेने संधी साधली आणि सासूला घरातून बाहेर काढण्यासाठी तिने सासूला मारहाण केलेली आहे. तर सासूचं वय हे 70 वर्ष एवढं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!