Mumbai | टीसीची कॉलर पकडून लोकलमध्ये तरूणीची दादागिरी

1
3

Mumbai | लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाइन आहे. रोज लाखो प्रवासी या मुंबई लोकलने प्रवास करत असतात. गर्दीच्या वेळेस लोकलमध्ये अनेक भांडणे होतात, पण काही वेळेस ही भांडणं रौद्ररूप धारण करतात. याच मुंबई लोकलमध्ये काही दिवसांपूर्वीच एका तरूणाला मारहाण झाल्याची घटना घडलेली होती. ती ताजी असतानाच सोमवारी (दि.09 ऑक्टोबर) एका तरूणीने मुंबई लोकलमधील टीसीवर हात उचलत टिसीला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.Mumbai

पश्चिम रेल्वे(western line) मार्गावरील चर्चगेट-गोरेगाव लोकल प्रवासादरम्यान ही सर्व घटना घडली आहे. एका तरूणीने टीसीच्या कॉलरला हात लावला आणि त्या टिसीला मारहाणह देखील केली. टीसीने तिकीटाची विचारणा केल्यानंतर संतपालेल्या या तरूणीने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले असून त्यामुळे इतर प्रवासी चांगलेच हादरले. याप्रकरणी आरोपी तरूणीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. परंतु या संपुर्ण घटनेमुळे टीसींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

नेमकं घडलं काय?

संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास चर्चगेट येथून गोरेगावच्या दिशेने निघालेल्या पश्चिम रेल्वे लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात एक तरूणी चढली होती. दादर स्टेशन येताच दोन महिला टीसी या डब्यात चढल्या आणि त्यांनी प्रवाशांचे तिकीट, पास तपासायला सुरूवात केली होती. मात्र या तरूणीकडे फर्स्ट क्लासचे तिकीट नसल्याने एका टीसीने तिला दंड भरण्याचे सांगितले. तेव्हा आरोपी तरूणीने दंड भरण्यास नकार दिला आणि त्या महिला टीसीसोबत वाद घालायला सुरूवात केली. हा वाद इतका वाढला कि संतप्त तरूणीने त्या महिला टीसीची कॉलरचं पकडली आणि त्या महिला टिसीला मारहाण आणि धक्काबुक्कीदेखील केली होती.

Buldhana | घर द्या किंवा बायको द्या..! बेरोजगार युवकांचं अजब आंदोलन

ही तरूणी हिंसक झाल्याने आजूबाजूच्या महिला प्रवाशांनी तिला रोखण्याचा प्रचंड प्रयत्न केला. तसेच एका महिलेने चेन खेचून लोकलदेखील थांबवली. त्यानंतर बराच काळ माहीम ते वांद्रे स्टेशनदरम्यान ही लोकल खोळंबली होती. लोकल वांद्रे रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर आरोपी तरुणीला महिला टीसीने उतरवून लोहमार्ग पोलिस ठाण्यात नेले आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here