Buldhana | घर द्या किंवा बायको द्या..! बेरोजगार युवकांचं अजब आंदोलन

0
1

Buldhana | बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चाललेला आहे. नोकरी नसल्यामुळे अनेकांचे लग्न देखील जमत नसल्याचे चित्र देखील पाहावयास मिळाले आहे. अशातच काही बेरोजगार तरुणांनी आपले गाऱ्हाणे मांडलेले आहे. ‘घर द्या किंवा बायको द्या..’ असे अजबगजब साकडं महाराष्ट्राच्या शासनाकडे मांडलेले आहेत.(Buldhana)

Nashik | नाशिकच्या सृष्टीचा ‘मी होणार सुपरस्टार २’ या कार्यक्रमात डंका

राज्यभरात लाखो तरुण उच्चशिक्षित होऊन देखील बेरोजगार आहेत. उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी नसल्याने राज्यातील तरुणांना लग्न जमण्यासाठी या गोष्टीचा अडथळा निर्माण होत आहे. बेरोजगार तरुणांना घर आणि नोकरी नसल्याने कोणीही लग्नासाठी मुलगी देण्यास तयार नसतं. राज्यातील अनेक युवकांचे वय हे ३५ ते ३८ च्या दरम्यान पोहोचले असताना त्यांची नोकरी आणि घरं नसल्याने लग्न जमत नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या युवकांनी आज संग्रामपूर पंचायत समितीवर ‘घर द्या किंवा बायको द्या’ असं म्हणत मोर्चा काढलेला आहे.

तरुणांनी पंचायत समितीवर मांडला ठिय्या 

युवकांनी सुरुवातीला संग्रामपूर येथील हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाला देखील साकडं घातलं. हनुमानासमोर ‘घर द्या किंवा बायको द्या’ अशा घोषणादेखील या तरुणांना दिलेल्या आहेत. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची संपूर्ण परिसरात मोठी चर्चा होत आहे. सध्या हे तरुण पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या देऊन आंदोलन करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here