Skip to content

Election | टाकेद ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत सदस्यपदी ‘गंगुबाई बगड’ बिनविरोध


Election Update | इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील अत्यंत चूरशीच्या आणि संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद बु. येथील प्रभाग क्रमांक 5 बांबळेवाडी येथील पोटनिवडणूक 2023 सर्वसाधारण स्त्री राखीव रिक्त जागेवर पहिल्यांदाच टाकेद ग्रामपंचायतच्या माजी दमदार रोखठोक ग्रामपंचायत सदस्या सौ गंगुबाई यशवंत बगड यांची सर्व ग्रामस्थ गावकऱ्यांनी जाहीर बिनविरोध निवड केली. जाहीर झालेल्या आणि होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 सर्वसाधारण या रिक्त जागेवर कुणीही अर्ज सादर केलेला नाही. (Election Update)

Crime News | सासुबाई जरा सांभाळुन…

एक अनुभवी मुसद्दी दमदार रोखठोक, पाठपुरावा करणाऱ्या आणि आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अत्यंत विश्वासू निकटवर्तीय असलेल्या माजी ग्रामपंचायत सदस्या अशी सौ. गंगुबाई बगड यांची ओळख आहे. याच त्यांच्या कार्याची सर्व ग्रामस्थांनी दखल घेत त्यांना पुन्हा एकदा या पोटनिवडणुकीत जाहीर बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य पदावर पाठवले आहे. दरम्यान रविवार (ता.०८) बांबळेवाडी येथील मुख्य विठ्ठल मंदिरासमोर सर्व ग्रामस्थ गावकरी आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांनी एकत्र येत सौ गंगुबाई बगड यांची बिनविरोध निवड करत गुलालाची उधळण करत एकच जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. सरपंच सौ.ताराबाई रतन बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, जेष्ठ वारकरी निवृत्ती मेमाणे, निवृत्ती बांबळे, कैलास भवारी, केशव बांबळे आदींसह सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी सौ.गंगुबाई बगड यांचे हार्दिक अभिनंदन करत भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मॉन्सुनचा फटका शेतीच्या उत्पादनावर; खरीप हंगामाचं काय होणार?

“सर्वसाधारण राखीव स्त्री जागेवर पोटनिवडणुकीत सर्व ग्रामस्थांनी माझी एकमताने निर्धार करून जाहीर बिनविरोध विश्वासाने सार्थ निवड केली. या सार्थ निवडीचे मी मनापासून आभार मानते आणि विकास कामांच्या माध्यमातून निश्चिंत लोकांच्या विश्वासाचे सार्थक करणार आहे.”
– सौ गंगुबाई यशवंत बगड (नवनिर्वाचित बिनविरोध ग्रामपंचायत सदस्या)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!