Nashik | जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती विहरिंनी गाठले तळ; पालकमंत्री अलर्ट मोडवर

0
11

Nashik | पालकमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाई बाबत आज आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील पाण्याची सद्यस्थिती काय आहे? याचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावर्षी पाऊस कमी प्रमाणात असल्याने काहीअंशी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. चाऱ्याची स्थिती काही प्रमाणात चांगली असली तरी सर्वांना विनंती आहे की, यावेळी परतीचा पाऊस आला नाही. भविष्यात हा परतीचा पाऊस आला नाही तर आपल्याला या क्षणापासून गांभीर्य पूर्ण नियोजन करण्याची गरज आहे. काही भागात पिण्याचे पाणी मिळणे देखील कठीण आहे ही वस्तूस्थिती आहे. ज्या ठिकाणी कालव्यातून पाणी पाझरत आहे. अशा सर्व ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्या सोडविण्याच्या सूचना केल्या आहेत.असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिलेले आहेत. (Nashik)

Buldhana | घर द्या किंवा बायको द्या..! बेरोजगार युवकांचं अजब आंदोलन

काही भागात अद्याप कालव्याचे पाणी पोहचलेले नाही. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तरतूद आवश्यक आहे. येणाऱ्या काळात ऑगस्ट 2024 पर्यंत पाण्याची व्यवस्था करण्याच्या यावेळी यंत्रणेला सूचना दिलेले आहेत. सर्व विभागांच्या संबंधित अधिकाऱ्यांची एक बैठक घेवून पिण्याचे पाणी कसे पोहचवले जाईल यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही परिस्थिती संवेदनशील असून ह्या बाबींकडे गांभीर्याने बघा. मागची परिस्थीत आणि आताची परिस्थिती यात मोठी तफावत आहे.असं  पालकमंत्री दादाजी भुसे यांनी म्हटले आहेत.

कृषी सिंचनाचा विषय महत्त्वाचा आहे. फळबाग वाचविणे गरजेचे आहे तसेच इतर पिकांसाठी किती पाणी लागेल याचे आरक्षण करून, त्यानंतर उद्योगांसाठी किती पाणी लागेल याचे गंभीरपणे नियोजन करावे लागेल. प्रत्येक गावातील पाणीपुरवठा योजना तपासून त्या कार्यान्वित आहेत का सद्यस्थिती काय आहे ? याचा आढावा घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आलेल्या आहेत. पाण्याचा एक थेंब देखील वाया जायला नको याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी.असं यावेळी सांगण्यात आलेलं आहे.

Buldhana | घर द्या किंवा बायको द्या..! बेरोजगार युवकांचं अजब आंदोलन

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या तसेच गुरांच्या पाण्यासाठी ऑगस्ट 2024 पर्यंत नियोजन करा. तसेच ही जबाबदारी ओळखून काम करण्याची सूचना अशा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या कमी असल्यास तात्पुरते कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या सूचना देखील पालकमंत्र्यांनी केलेल्या आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here