Michaung Cyclone | ‘मिचॉंग’ चक्रीवादळ माजवणार कहर; 118 रेल्वेगाड्या रद्द

0
11

Michaung Cyclone | भारतीय किनारपट्टीवर पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा टप्पा निर्माण झालेला असून या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. आता हे मिचॉंग चक्रीवादळ (Michaung Cyclone)  मंगळवारी (दि. ०५) डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशामधील नेल्लोर आणि मछलीपट्टणम किनारपट्टीवर धडकणार आहे. सोमवारी (दि. ०४) हे वादळ उत्तर तामिळनाडूत आलेले आहे. या वादळामुळे किनारपट्टीवर ११० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. सध्या चक्रीवादळ पुडुच्चेरीपासून २५० किमी पूर्व-दक्षिणपूर्व, चेन्नईपासून २३० किमी पूर्व-दक्षिणपूर्व, नेल्लोरपासून ३५० किमी दक्षिणपूर्वमध्ये आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रवरही होणार आहे. (Michaung Cyclone)

एनडीआरएफच्या टीम तैनात

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात ‘मिचॉंग’ चक्रीवादळ ३ डिसेंबर निर्माण झालेले आहे.चक्रीवादळामुळे १०० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुडुच्चेरीत एनडीआरएफच्या २१ टीम तैनात करण्यात आलेल्या आहेत. तसेच आठ अतिरिक्त टीम राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. चक्रीवादळाच्या धोक्यामुळे केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून या बैठकीत राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

118 ट्रेन रद्द, सार्वजनिक सुटी जाहीर

चक्रीवादळाच्या धोका लक्षात घेऊन ११८ रेल्वे रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये हावड-चेन्नई एक्सप्रेस, शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस, पुडुचेरी-हावडा एक्सप्रेस, एलेप्पी-धनबाद एक्सप्रेस, टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेस, कन्याकुमारी-डिब्रूगढ विवेक एक्सप्रेस, चेन्नई-पुरी एक्सप्रेस या रेल्वेंचा समावेश आहे. तामिळनाडूत ४९६७ बचाव शिबिर तयार करण्यात आलेले आहेत. राज्य सरकारने चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपूरम आणि चेंगलपट्टूमध्ये सार्वजिनक सुटी जाहीर केली आहे.

Nashik Crime | पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पत्नीच्या खुनानंतर पतीचं टोकाचं पाऊल

महाराष्ट्रात पडणार पाऊस

‘मिचॉंग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. मागील आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु असून आता पुन्हा पावसाचा अंदाज असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झालेले आहे. दरम्यान राज्य सरकारने यापूर्वी झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. (Michaung Cyclone)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here